पोस्ट्स

जानेवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शेतकरी विरोधी कायदे.....

इमेज
शेतकरी विरोधी कायदे..       सदरील लेखातील भाग हा अमर हबीब लिखीत शेतकरी विरोधी कायदे या पुस्तीकेतील आहे. ही पुस्तीका प्रश्न-उत्तर स्वरुपात आहे. यामध्ये एकुण ३७ प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यापैकी भाग एक मध्ये एकुण २४ प्रश्नाचा सारांश या लेखामध्ये समाविष्ट केला आहे.      कृषी प्रधान देश अशी भारताची गणना १९६५ नंतर केली जावू लागली. भारत देश तसा कृषी प्रधान आहे ते फक्त शेतकऱ्यांची लूट होई पर्यंत. सा-या जगाला अन्नधान्य पुरवठा करणे पर्यंत. पण यांच्या मुळ प्रश्नांकडे कोणी लक्ष देतात का? तर नाही. आजही हा शेतकरी राजा नावालाच शिल्लक राहिला. शेतात घाम गाळणार, कष्ट करणार, हडाचे काड करणार मात्र पदरात निराशा. ही अवस्था ह्या शेतकरी राजाची आज आहे.       आत्महत्या करणे चुक आहे मात्र हे विधान शेतकरी राजास लागु होत नाही. भारतामध्ये पहिली शेतकरी आत्महत्या १९ मार्च १९८६ साली झाली. ही आत्महत्या जाहीर स्वरुपाची ( चिठ्ठी लिहून ) होती.  १९९० च्या नंतर शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढत गेले. याचाच परिणाम असा झाला की, केंद्राच्या नॅशनल क्राईम रेकॉर्डस ब्युरोने शेतकरी ...