पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आम्ही भारतीय लोकशाहीतले गोर बंजारा लोक

इमेज
गोरबंजारा समाजाचे राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक  वास्तव मांडणारा अनमोल ग्रंथ! आम्ही भारतीय लोकशाहीतले गोर बंजारा लोक. ✍ लेखक- बळीराम शेषेराव चव्हाण.       संपर्क- 9028446941/42  ✍️समीक्षक - याडीकार पंजाबराव चव्हाण, पुसद- 9421774372 •••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••       गोरबंजारा समाजातील नवोदित लेखक- बळीराम शेषेराव चव्हाण यांनी आठवणीने आम्ही भारतीय लोकशाहीतले गोर बंजारा लोक हे पुस्तक मला समीक्षा करिता पाठवले. सदर पुस्तकाचे वाचन केले असता गोर बंजारा समाजाच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि शैक्षणिक स्थितीचे वास्तव  मांडणारा हा अनमोल  ग्रंथ असल्याचे पानोपानी दिसुन आले. गोरबंजारा समाजात अनेक नवोदित लेखक/ कवींनी मागील दोन तीन वर्षात अत्यंत चांगली पुस्तके प्रकाशन करण्याचा सपाटा लावलेला आहे. यामध्ये लेखक बळीराम शेषराव चव्हाण यांचे आम्ही भारतीय लोकशाहीतले गोर बंजारा लोक या अनमोल ग्रंथाची भर पडलेली आहे. 15 ऑगस्ट 2022 रोजी प्रकाशन झालेले हे पुस्तक कमी काळातच सर्व दूर पोहोचल्याचे अनेक वेळा दिसून आलेले आहे. सदर  पुस्तकामध्...

नोंदणी दिनांक, वाढीव रक्कम व सुधारित घरभाडे न दिल्यास आमरण उपोषणाचा इशारा..

इमेज
      आज महाज्योती संशोधक विद्यार्थी कृती समिती महाराष्ट्र राज्य. कडून समाज कल्याण येथील महाज्योतीच्या प्रादेशिक कार्यालयात विद्यापीठ नोंदणी दिनांकापासून फेलोशिप देण्यात यावी. विद्यापीठ नोंदणी दिनांकापासून फेलोशिप संदर्भात . तसेच विद्यापीठ अनुदान आयोग यांचे पत्र १६ ऑक्टोबर २०२३ च्या सार्वजनिक सूचनेनुसार फेलोशिपच्या रकमेत जी वाढ केलेली आहे; ती रक्कम दिनांक १ जानेवारी २०२३ पासून अमंलबजावणी करावी. त्यानुसार फेलोशिप रक्कम वाढवून देण्यात यावी. फेलोशिप वाढीव रक्कम संदर्भात.. शासनाच्या ५ फेब्रुवारी २०१९ च्या सुधारित नियमानुसार घर भाडे देण्यात यावे. याचे स्मरणपत्र व निवेदन महाज्योती या संस्थेस संशोधक विद्यार्थ्यांनी आज दिले. जर विद्यापीठ नोंदणी दिनांकापासून फेलोशिप, वाढीव रक्कम व सुधारित घरभाडे देण्याबाबत निर्णय न झाल्यास ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आमरण उपोषण करण्यात येईल. असा इशारा महाज्योती संशोधक विद्यार्थी कृती समिती महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष बळीराम चव्हाण यांनी दिला आहे. निवेदनावर बळीराम चव्हाण, रामेश्वर मुळे, वरुण जाधव, राठोड अंकुश, अनिल वीर, जयश्री भावसार, ...