सारथी बार्टी मालामाल व महाज्योती हमाल !!
सारथी बार्टी मालामाल व महाज्योती हमाल !! भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेमध्ये न्याय व समता या सारखे बहुमोल तत्व समाविष्ट करण्यात आलेले आहे. तसेच सामाजिक न्यायाच्या उद्देशाने आर्थिक दृष्ट्या सक्षम नसणारे, उच्च शिक्षणामध्ये संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण हितासाठी सर्वप्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात (बार्टी) अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी 29 डिसेंबर 1978 साली स्थापन करण्यात आली. मात्र 2008 साली स्वायतत्ता देण्यात आली. त्याच धर्तीवर मराठा व कुणबी मराठा समाजासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास या स्वायत्त संस्थेची अर्थात (सारथी) स्थापना 25 जून 2018 रोजी करण्यात आली. तसेच त्याच धर्तीवर ओबीसी, भटके-विमुक्त व इतर विशेष मागासवर्गीय समुदायासाठी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात (महाज्योती) या स्वायत्त संस्थेची स्थापना 8 ऑगस्ट 2018 रोजी करण्यात आली. सामाजिक न्याय व समतेच्या दृष्टिकोनातून स्थापन करण्यात आलेल्या वरील तिन्ही संस्थांपैकी महाज्योती या संस्थेमध्ये पात्र असणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांन...