पोस्ट्स

बंजारा समाजाला ST आरक्षण मिळावे

इमेज
बंजारा समाजाला ST आरक्षण मिळावे, विभागीय आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजी नगर.         बंजारा समाजाला हैद्राबाद गॅझेट, जिल्हा गॅझेट, महसुली नोंदी, आंध्रप्रदेश व तेलंगणा राज्यातील बंजारा समाज अनुसूचित जमातीचे आरक्षण लाभार्थी या आधारावर अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यात यावे. याकरिता आज महाज्योती संशोधक विद्यार्थी कृती समिती, महाराष्ट्र राज्य व गोर बंजारा संशोधक व स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी यांनी मा. मुख्यमंत्री यांना विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजी नगर मार्फत निवेदन दिले. त्यांची प्रमुख दोन मागणी आहे. १) गोर बंजारा समाजास तातडीने अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करून शासन निर्णय काढावा. २)गोर बंजारा समाजास अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र तात्काळ वाटप करावे. या मागण्या करिता निवेदन सादर केले. या प्रसंगी महाज्योती संशोधक विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष बळीराम चव्हाण, बाळू चव्हाण, ज्ञानेश्वर पवार, मारुती जाधव, अंकुश राठोड, रामेश्वर मुळे, प्रवीण आडे, गजानन पवार, पंडित चव्हाण, वरून जाधव, शिवाजी चव्हाण, सुनीता पवार, प्रवीण राठोड, पी. एन राठोड हे उपस्थित होते.

फाल्गुनातील बंजारा होळी उत्सव.!

इमेज
फाल्गुनातील बंजारा होळी उत्सव.!   चालोरे डायसाणें होळीर खेला!    भारत वर्षात होळी हा सण प्रामुख्याने सर्व जाती-जमातीची लोक साजरा करतात. परंतु बंजारा समाजात होळीचा सण साजरा करण्याची प्रथा फारच वेगळी असून मनाला अति आनंद देणारी आहे. मुळातच नाच-गाण्यात मदमस्त जीवन जगणारी ही गोरबंजारा जमात होळी सणात आपली पूर्ण हाऊस भागून घेते. गोरबंजारा गणात सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे होळी म्हातारे-कोतारे माणसाला होळी तारुण्य देते. उनाड तरणीबांड पोराना ती चावटपणा देते. मोहाच्या फुलाची (पेलेधारे) फुल दारू पिऊन पक्षपात, वैयक्तिक स्वार्थ, हेवेदावे विसरून होळी खेळावी ती गोरबंजारा समाजांनीच. फाल्गुन महिना लागला रे लागला की डपाच्या आवाजांनी होळी हळू हळू तांडया कडे येते. शेतामध्ये राब राब राबून थकून गेलेले लोक रोज रात्रीला गोलाकार बसल्याजागी बैठे लेंगी गीत गातात. डफ धीरो वजारे तारी जाणीं ढळजा,  डफ धीरोवजार डफडारो घोर सामळीं पाणीं भरतु,  वुतो फेक दिनी बेडलो. तारी जाणीं ढळजा रं डफ धीरो वजार...! भा वार्थ: हे मित्रा डफ हळू वाजव तुझ्या डफडयाचा आवाज तिच्या पंर्यत जर गेला तर ति रंगात येईल. ती...

महाराष्ट्रातील गोरबंजारा ( विमुक्त जाती -भटक्या जमातीचा) आरक्षणाचा इतिहास ! (२० नोव्हेंबर १९६१ ते ९ एप्रिल १९६५)

इमेज
महाराष्ट्रातील गोरबंजारा ( विमुक्त जाती -भटक्या जमातीचा) आरक्षणाचा इतिहास ! (२० नोव्हेंबर १९६१ ते ९ एप्रिल १९६५)  ---- याडीकार पंजाबराव चव्हाण पुसद - 9421774372       भटक्या- विमुक्तांचा आरक्षणाचा इतिहास हा रंजक आणि ऐतिहासिक आहे. देशात प्रथम १७ ऑगस्ट १९३२ साली अनुसूचित जाती-जमातीची सूची तयार करण्यात आली होती. त्या सूचीनुसारच इंग्रजांच्या काळात तयार झालेल्या यादीला इ. स. १९५० साली अनुसूचित जाती जमातीला घटनात्मक मान्यता मिळाली आणि त्यांना अनुक्रमे १३ % व ७ % आरक्षण  देण्यात आले. परंतु भारताला स्वातंत्र्य मिळाले पण भटके- विमुक्तांना घटनात्मक स्वातंत्र्य केंव्हा मिळणार हा मोठा गंभीर प्रश्न आहे? गुन्हेगार जमातीचा कायदा - १८७१         स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये उत्तर प्रदेशातील वीरांगणा हुमणीबाई यांच्या  अनेक साथीदारांनी ब्रिटिश शासनाच्या ३५० सैनिकांना पाण्यामध्ये बुडवून ठार केले होते. १८५७ च्या बंडातही  भटक्यांनी पराक्रम गाजवले, वीरमरण पत्करले आणि डोंगरदर्‍याचा आश्रय घेतलेल्या भटक्या-विमुक्त लोकांनी पशुपालन, शिकार, थोडीफार शेती अशा पद्धत...
इमेज
नोंदणी दिनांकापासून फेलोशीपकरिता महाज्योतीचे संशोधक करणार आमरण उपोषण.. १९ एप्रिल २०२३ पासून स्थगित करण्यात आलेले आंदोलन पुन्हा सुरू करणार.. महाज्योती संस्थेची फेलोशीप ही विद्यापीठ नोंदणी दिनांकापासून देण्यात यावी ही मागणी संस्था स्थापन झाल्या पासून (२०१९) अजूनही प्रलंबित आहे. यासाठी संशोधक वारंवार पुरवठा करूनही व मागील आमरण उपोषणापासुन १४ महिने उलटूनही ही मागणी प्रलंबित आहे.  ही मागणी माण्य करण्याकरिता सर्व संशोधक  विद्यार्थी ०१/०७/२०२४ पासून महाज्योती प्रादेशिक कार्यालय, सामाजिक न्याय भवन, छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी आमरण उपोषणाला बसणार आहेत. या काळात कोण्या संशोधक विद्यार्थांना काही झाल्यास याची सर्व जबाबदारी ही महाज्योती संस्थाची राहील असे संशोधक विद्यार्थ्यांनी सांगितले..           

घटणारे मतांचे प्रमाण कोणास हानिकारक?

इमेज
घटणारे मतांचे प्रमाण कोणास हानिकारक?       भारतीय लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये कोणत्याही संघर्षाशिवाय व कोणतेही जात, धर्म, पंथ, लिंग किंवा सामाजिक समूह न पाहता सर्वांनाच मतदानाचा अधिकार भारत स्वतंत्र झाला तेव्हाच देण्यात आला. भारतीय राज्यघटनेने या देशातील सर्वसामान्यांपासून तर उच्चवर्गीयांपर्यंत (प्रस्थापित)  सर्वांना समान मतदानाचा अधिकार घटनेतील कलम 326 नुसार 'घटनात्मक अधिकार' म्हणून बहाल केला आहे. परंतु या विरुद्ध विचार केला तर ज्या देशाला आपण लोकशाहीची जननी म्हणतो, त्या ब्रिटनमध्ये स्त्रियांना मतदानाचा अधिकार १९२८ मध्ये देण्यात आला. तसेच जगाची महासत्ता म्हणून ओळख असणाऱ्या अमेरिकेने  १९७६ ला All Men are Born Free and Equal हे सूत्र घेऊन राज्यघटना स्वीकारली गेली. परंतु स्त्रियांना मतदानाचा अधिकार १९२० मध्ये देण्यात आला. या प्रगत देशांचा विचार केला असता आपला भारत देश जो १५० वर्ष इंग्रजांच्या गुलामीत होता या गुलामीतून १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला, त्याच दिवशी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणताही भेदभाव न करता सर्वांना समान मतदानाचा अध...

समनक जनता पार्टी राजकीय प्रस्थापितशाही नष्ट करेल!

इमेज
लोकसभा बुलेटिन क्रमांक-१२ समनक जनता पार्टी राजकीय प्रस्थापितशाही नष्ट करेल! महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणार?. ✍️याडीकार पंजाबराव चव्हाण, पुसद- 9421774372 ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••       9 एप्रिल 2023 रोजी माहूरगड येथे समनक जनता पार्टी लॉन्च करण्यात आली होती .लोकसभा निवडणुकीमध्ये यवतमाळ, वाशिम, हिंगोली आणि परभणी येथे समनक जनता पार्टीने उमेदवार उभे केलेले असून समनक जनता पार्टीचे *स्टार प्रचारक प्रा. संदेश चव्हाण राष्ट्रीय अध्यक्ष गोरसेना* यांनी प्रचारामध्ये प्रचंड आघाडी घेतलेली असल्याने राजकीय पक्षाचे धाबे दणाणले आहे. त्याबद्दल मी मनःपूर्वक स्वागत करतो!आणि त्यांच्या सर्व उमेदवारांचे सुयश चिंतींतो !💐💐       लोकसभेच्या निवडणुका आधी प्रा. संपत चव्हाण यांनी समनक जनता पार्टी लॉन्च करणे हे जरी काही लोकांना आणि पक्षाला खटकत असले, तरीही गोरबंजारा हितासाठी मला फार महत्त्वाचे वाटत आहे. आज महाराष्ट्राच्या राजकारणाचा जर विचार केला तर गेल्या दोन वर्षापासून महाराष्ट्रातिल राजकारण फार ढवळून निघत आहे. कोणत्याही पक्षाकडे आज जनमत नाही. एकमे...