घटणारे मतांचे प्रमाण कोणास हानिकारक?
घटणारे मतांचे प्रमाण कोणास हानिकारक? भारतीय लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये कोणत्याही संघर्षाशिवाय व कोणतेही जात, धर्म, पंथ, लिंग किंवा सामाजिक समूह न पाहता सर्वांनाच मतदानाचा अधिकार भारत स्वतंत्र झाला तेव्हाच देण्यात आला. भारतीय राज्यघटनेने या देशातील सर्वसामान्यांपासून तर उच्चवर्गीयांपर्यंत (प्रस्थापित) सर्वांना समान मतदानाचा अधिकार घटनेतील कलम 326 नुसार 'घटनात्मक अधिकार' म्हणून बहाल केला आहे. परंतु या विरुद्ध विचार केला तर ज्या देशाला आपण लोकशाहीची जननी म्हणतो, त्या ब्रिटनमध्ये स्त्रियांना मतदानाचा अधिकार १९२८ मध्ये देण्यात आला. तसेच जगाची महासत्ता म्हणून ओळख असणाऱ्या अमेरिकेने १९७६ ला All Men are Born Free and Equal हे सूत्र घेऊन राज्यघटना स्वीकारली गेली. परंतु स्त्रियांना मतदानाचा अधिकार १९२० मध्ये देण्यात आला. या प्रगत देशांचा विचार केला असता आपला भारत देश जो १५० वर्ष इंग्रजांच्या गुलामीत होता या गुलामीतून १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला, त्याच दिवशी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणताही भेदभाव न करता सर्वांना समान मतदानाचा अध...