शिक्षणाचा महामेरू: महात्मा फुले भारतीय समाजाच्या पाया हा चार वर्णावर आधारित आहे. अर्थातच वर्णव्यवस्थेचा पुरस्कारर्ता म्हणून भारत देशाला ओळखले जाते. या वर्णव्यवस्थेतून जातीय उतरंड निर्माण झाल्याचे देखील पाहायला मिळते. या जातीय उतरंडीमुळे वरतून खाली तिरस्कार व खालून वर द्वेष (ब्राह्मण ते अतिशूद्र व अतिशूद्र ते ब्राह्मण) एकमेकांबद्दल टोकाचा होता. यामुळे भारतीय समाज हा पूर्णपणे विषमतामुलक बनलेला होता. या विषमतामुलक स्थितीमध्ये बदल घडवून आणण्यासाठी व समाजामध्ये समता प्रस्थापित व्हावी, आधुनिक शिक्षण व्यवस्थेचा स्वीकार भारतीयांनी करावा, अंधश्रद्धेपासून भारतीयांची मुक्तता व्हावी, भटांच्या कटातून, अंधश्रद्धेतुन भारतीयांना मुक्तता मिळावी, एक नवी दृष्टी मिळावी. या अस्थिर समाज व्यवस्थेला छेद देऊन या समाजात नव चैतन्य घडवून आणणारे महात्मा ज्योतिबा फुले यांचा आज 133 वा स्मृतिदिन जेव्हा आपण साजरा करतो तेव्हा त्यांचे आठवण म्हणून त्यांच्या विचाराची जागरण करत असतो. की ज्या विचारामुळे समाज जागृत होत आहे. आधुनिक काळात ज्याला आपण शिक्षण म्हणतो ते शिक्षण मह...