बंजारा समाजाचे जगद्गुरू संत डॉ. रामरावजी महाराजांच्या निर्वाणाची पोकळी भरून निघेल का?
बंजारा समाजाचे जगद्गुरू संत डॉ. रामरावजी महाराजांच्या निर्वाणाची पोकळी भरून निघेल का? बंजारा समाजाचे आद्य गुरु डॉ. संत रामरावजी बापू यांच्या निधनाची बातमी कळताच समस्त बंजारा समाज व समाजेत्तर भक्तजगणात शोककळा पसरली. संत रामराव महाराजांच्या जाण्याने बंजारा समाज आज पोरका झाला. संत रामराव महाराज हे जगद्गुरु संत श्री. सेवालाल महाराजांचे वंशज आहेत .त्यांचे आयुष्य हे ब्रम्हचर्य जिवन जंगले. ते जन्मभर अन्नग्रहण केले नाही. केवळ दुधावर आपले जीवन व्यतीत करणारा आचार विचार आणि सदाचार यामध्ये कधीही फारकत न करणारा संत हा निराळाच आहे . रामराव महाराज यांचा जन्म ७ जुलै १९३५ रोजी झाला व मुत्यु ३० आॅक्टोबर २०२० रोजी मुंबई स्थित झाला. माता पुतळाबाई व पिता परशुराम यांच्या पोटी जन्मलेले रत्न यांचा जन्म गुरु पौर्णिमेला झाला व निर्वाण कोजागिरी पौर्णिमेला झाला. हा एक निव्वळ योगायोग म्हणावा लागेल. संत सेवालाल महाराजांच्या विचाराचा प्रचार प्रसार त्यानी वाडी, वस्ती व तांड्यावर केला. विमुक्त जाती भटक्या जमातीच्या वाळवंटात त्यांनी अध्यात्माची हिरवळ फुलवली. ...