पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वास्तविक जीवनाचा मार्गदाता संत सेवालाल..

इमेज
वास्तविक जीवनाचा मार्गदाता संत सेवालाल..         महाराष्ट्राच्या माती मध्ये अनेक संत परंपरा उदयाला आल्या. महाराष्ट्राच्या मातीला जसा पराक्रमाचा वारसा आहे तसा संतांच्या विचारांचा सुगंध आहे.महान महाराष्ट्राच्या भूमीत अनेक जाती धर्मात साधु-संत, प्रबोधनकार, कीर्तनकार, समाज सुधारकांनी जन्म घेतला. त्या सर्वांचे विचार हे कोणत्याही जातीपुरते मर्यादित नसतात. तर त्यांचे मार्गदर्शन, विचार, प्रबोधन, भजन-कीर्तन, दोहे, कवणे हे जनतेच्या जडण-घडणीसाठी दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरतात. मुळात महाराष्ट्राची जडण-घडण संताच्या विचारातून झालेली आहे. समाजातील वाईट चालीरीती, अज्ञान, अंधश्रद्धा, जातीव्यवस्था नष्ट करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य याच संत मंडळीच्या विचारातून पुढे येते. अशाच अनेक विज्ञानवादी विचारांचा वसा घेऊन जन्मभर समाजसुधारणेसाठी झगडणारे भटक्या विमुक्त जातीतील बंजारा समाजात संत सेवालाल महाराज यांचा जन्म तत्कालिन आंध्रप्रदेश व सध्याच्या तेलंगणा राज्यातील अनंतपूर जिल्ह्यात असणाऱ्या गुत्ती तालुक्यातील गोलार डोडी या तांड्यात 15 फेब्रुवारी 1739 रोजी झाला. सध्याच्या परिस्थितीत त्या गाव...