कृषी क्रांतीचे जनक वसंतराव नाईक
कृषी क्रांतीचे जनक वसंतराव नाईक महाराष्ट्राच्या हरितक्रांतीचे प्रणेते, कृषीतज्ञ व महाराष्ट्राचे सलग अकरा वर्ष मुख्यमंत्रीपदी राहणारे व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख समाजमनात आहे. कृषी तज्ञ डॉ.व्ही.बी.भिसे म्हणतात की, "वसंतराव नाईक दीर्घकाळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते परंतु ते कधीही एका जातीचे नेते होते असे जाणवले नाही". ग्रामीण भागामध्ये जन्मलेले, स्वकर्तृत्वाने राजकारण समाजकारण यामध्ये छाप सोडली. त्यांची तल्लख बुद्धिमत्ता, संघटन कौशल्य, दूरदृष्टी, अखंड परिश्रम, सर्वसामान्य, उपेक्षित व शेतकऱ्यांबद्दल त्यांची कळवळ हेच त्यांचे गुण त्यांना राजकारणाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचवून सुद्धा ते मनाने शेतकरी राजाच होते. तसं वसंतराव नाईक हे आधुनिक विचाराने प्रेरित झालेले होते. त्यांच्यावर महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व डेल काने॑न यांसारख्या विद्वानांचा प्रभाव पडलेला होता. ते पुसद नगरपालिकेच्या अध्यक्षपदापासून तर मुख्यमंत्रीपद असा त्यांचा राजकीय प्रवास होता त्यामध्ये त्यांनी अनेक मंत्री पद देखील भूषवली. मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत त्यांनी मराठी...