महाराष्ट्रातील गोरबंजारा ( विमुक्त जाती -भटक्या जमातीचा) आरक्षणाचा इतिहास ! (२० नोव्हेंबर १९६१ ते ९ एप्रिल १९६५)
महाराष्ट्रातील गोरबंजारा ( विमुक्त जाती -भटक्या जमातीचा) आरक्षणाचा इतिहास ! (२० नोव्हेंबर १९६१ ते ९ एप्रिल १९६५) ---- याडीकार पंजाबराव चव्हाण पुसद - 9421774372 भटक्या- विमुक्तांचा आरक्षणाचा इतिहास हा रंजक आणि ऐतिहासिक आहे. देशात प्रथम १७ ऑगस्ट १९३२ साली अनुसूचित जाती-जमातीची सूची तयार करण्यात आली होती. त्या सूचीनुसारच इंग्रजांच्या काळात तयार झालेल्या यादीला इ. स. १९५० साली अनुसूचित जाती जमातीला घटनात्मक मान्यता मिळाली आणि त्यांना अनुक्रमे १३ % व ७ % आरक्षण देण्यात आले. परंतु भारताला स्वातंत्र्य मिळाले पण भटके- विमुक्तांना घटनात्मक स्वातंत्र्य केंव्हा मिळणार हा मोठा गंभीर प्रश्न आहे? गुन्हेगार जमातीचा कायदा - १८७१ स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये उत्तर प्रदेशातील वीरांगणा हुमणीबाई यांच्या अनेक साथीदारांनी ब्रिटिश शासनाच्या ३५० सैनिकांना पाण्यामध्ये बुडवून ठार केले होते. १८५७ च्या बंडातही भटक्यांनी पराक्रम गाजवले, वीरमरण पत्करले आणि डोंगरदर्याचा आश्रय घेतलेल्या भटक्या-विमुक्त लोकांनी पशुपालन, शिकार, थोडीफार शेती अशा पद्धत...