सावित्री ज्योती व आजच्या स्त्रिया
सावित्री ज्योती व आजच्या स्त्रिया भारतीय समाज व्यवस्था ही वर्णव्यवस्थेवर आधारित आहे. या वर्ण व्यवस्थेनुसार जातीव्यवस्था निर्माण झाल्या. या व्यवस्थेत स्त्रियांना शुद्रा पेक्षाही हीन वागणूक दिली जायची, त्यांना दुय्यम दर्जा दिला जायचा. मात्र यामध्ये प्रस्थापित सनातनी (ब्राह्मण) लोकांच्या विरोधाला सामोरे जाऊन परिवर्तन घडवून आणण्यासाठी 18 व्या शतकामध्ये महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी सामाजिक व शैक्षणिक क्रांतीची ज्योत पेटवली. अशा सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. 1840 मध्ये वयाच्या 9 व्या वर्षी त्यांचे 12 वर्षाच्या ज्योतिबा फुले यांच्याशी विवाह झाला. आज 21 व्या शतकामध्ये आपण वावरत आहोत, जगामध्ये अनेक नव-नव्या घडामोडी घडल्या आणि विशेषता: स्त्री जीवनात प्रचंड बदल झालेला दिसतो. कारण यापूर्वी, म्हणजेच शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार होण्यापूर्वी स्त्री म्हणजे प्रजोत्पादनाचे मानवी खेळणे, स्त्री ही पुरुषप्रधान संस्कृतीची दासी, तिने पुरुषाच्या सुखासाठी उभे आयु...