पोस्ट्स

डिसेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पाच डिसेंबर बंजारा गौरव दिन.

इमेज
पाच डिसेंबर बंजारा गौरव दिन.. .         स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्र घडवण्यात ज्या काही थोर विभूतींचे योगदान आहे; त्या विभुतीमध्ये वसंतराव नाईक यांच्या नावाचा प्रधान्याने उल्लेख केला जातो. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील, सुधाकरराव नाईक यांसारख्या प्रख्यात मुख्यमंत्र्यांसोबत वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने सुजलाम-सुफलाम केले. आज महाराष्ट्र जो काही घडला आहे यामध्ये वसंतराव नाईक यांचा सिंहाचा वाटा आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी ११ वर्ष विराजमान राहिलेल्या वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्रातील उत्पादन वाढीसाठी उल्लेखनीय काम केले. आपल्या १९५२ ते १९६९ या २७ वर्षाच्या कार्यकाळात शेतीविषयक अनेक महत्त्वपूर्ण योजना राबवल्या. "दोन वर्षात महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपुर्ण झाला नाही; तर मी फाशी घेईल" हे धाडसी उद्गार त्यांनी १९७१ मध्ये पूर्णत्वास आणले. त्यांच्या शेतीविषयक कार्याचे कौतुक तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केला. त्यांनी रोजगार हमी योजना देशभरात राबवली. ' तांड...