पोस्ट्स

एप्रिल, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

राजकारण्यांचा ढोंग आणि भोंग्यांचा सोंग...

इमेज
  राजकारण्यांचा ढोंग आणि भोंग्यांचा सोंग...       छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा हा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो. आज या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अनेक जाती-धर्माचे लोक गुण्या-गोविंदाने नांदताना आपल्याला दिसते. मात्र या सुखी संसारामध्ये आग लावण्याचे काम मात्र राजकारणी मंडळी सातत्याने करताना दिसून येते. या आगीतुन आपली राजकीय पोळी भाजून घेतात हे काही आपल्यासाठी नवीन नाही. विशेषतः आग निवडणूक जवळ आल्यास किंवा निवडणुकीचा काळ  चालू असताना अधिक धगधगते, या धगधगत्या आगीत राजकारणी मंडळी व त्यांचे पुत्र/चिरंजीव, कन्या आप्त-स्वकीय हे कधीच या आगीच्या रणांगणात उतरत नाही. उतरतात ते आमचे हिंदू बहुजन पोरं. यातून फायदा तर या बहुजन पोरांचा काही होत नाही; मात्र नुकसान ही अटळ असते.           महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कर्ते-धर्ते व राष्ट्रीय अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिवाजी पार्क मुंबई या ठिकाणी सभा घेतली.  त्या सभेमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितले क...

ओबीसी, भटक्या-विमुक्तांचा प्राणवायू: डॉ. बाबासाहेब आंबेडकर..

इमेज
ओबीसी, भटक्या-विमुक्तांचा प्राणवायू: डॉ. बाबासाहेब आंबेडकर.. बळीराम शेषराव चव्हाण,  उस्मानाबाद,  संशोधक विद्यार्थी, 9028446942        आजच्या भारतीय समाजव्यवस्थेतील उच्च शिक्षित  व असुशिक्षित मंडळी (वैचारिक अभ्यासक अपवाद वगळता) मग ते कोणत्याही जाती-धर्माचे असूदेत (अपवाद बुद्धिस्ट) सर्वांचा एकच प्रश्न असतो तो म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी काय केले? हा गैरसमज ओबीसी व इतर जातींच्या लोकांमध्ये पेरण्याचे काम जातीवीद्यांनी केला. प्रल्हाद लुलेकर यांनी ओबीसीं यांच्या संदर्भात एक छान व्यख्या केलेली आहे, ते म्हणतात "या देशात सर्वात विस्कळीत, असंघटित, खंडित आणि त्यामुळेच आत्मविश्वास नसलेला वर्ग म्हणजे इतर मागास वर्ग होय".  आणि हे खरे आहे हा समाज आजच्या घडीला खऱ्या अर्थाने सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात अजिबात अस्तित्व नसलेला समाज व स्वतःचे अस्तित्वच हरवून बसलेला समाज म्हटले तरी वावगे ठरणार नाही. भविष्याचा वेध घेणारा जाणता राजा..          ओबीसी व भटक्या विमुक्तांच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांच्या हितां...