सर्वच राष्ट्रीय पक्षांनी लोकसभेला बंजारा समाजातील उमेदवार न दिल्यास गोरबंजारा समाज वेगळा निर्णय करणार...?
लोकसभा बुलेटिन क्रंमाक- 5 सर्वच राष्ट्रीय पक्षांनी लोकसभेला बंजारा समाजातील उमेदवार न दिल्यास गोरबंजारा समाज वेगळा निर्णय करणार...? बंजारा बहुल मतदार संघात अपक्ष उमेदवार उभे करणार! १) यवतमाळ- वाशिम प्रा. प्रवीण पवार २) हिंगोली- प्रा. कैलास राठोड ३) बीड -रविकांत राठोड ४) जालना- राजेशभाऊ जालनेकर आणि ५). नांदेड- सुरेश राठोड. ✍️ याडीकार पंजाबराव चव्हाण पुसद - 9421774372 •••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••• लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता केंव्हाही लागु शकते... मागच्या आठवड्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी यवतमाळ येथील सभेत लोकसभा निवडणुकीचे संकेत दिले. परंतु भाजपा पक्षाकडून लोकसभेची उमेदवारी कोणाला हे त्यांनी जाहीर केले नाही. यावरून सर्वच राष्ट्रीय पक्षांनी लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करतांना सावध पवित्रा घेत आहे.कारण विरोधी पक्षाचा उमेदवार कोणता येतो याची वाट सर्वच पक्ष पाहात असुन कोणत्याही परिस्थितीत यवतमाळ -वाशिम, हिंगोली, नांदेड ,आणि जालना मतदारसंघात गोरबंजारा समाजातील उमेदवार न देण्याचाच...