बंजारा समाजाला ST आरक्षण मिळावे
बंजारा समाजाला ST आरक्षण मिळावे, विभागीय आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजी नगर. बंजारा समाजाला हैद्राबाद गॅझेट, जिल्हा गॅझेट, महसुली नोंदी, आंध्रप्रदेश व तेलंगणा राज्यातील बंजारा समाज अनुसूचित जमातीचे आरक्षण लाभार्थी या आधारावर अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यात यावे. याकरिता आज महाज्योती संशोधक विद्यार्थी कृती समिती, महाराष्ट्र राज्य व गोर बंजारा संशोधक व स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी यांनी मा. मुख्यमंत्री यांना विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजी नगर मार्फत निवेदन दिले. त्यांची प्रमुख दोन मागणी आहे. १) गोर बंजारा समाजास तातडीने अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करून शासन निर्णय काढावा. २)गोर बंजारा समाजास अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र तात्काळ वाटप करावे. या मागण्या करिता निवेदन सादर केले. या प्रसंगी महाज्योती संशोधक विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष बळीराम चव्हाण, बाळू चव्हाण, ज्ञानेश्वर पवार, मारुती जाधव, अंकुश राठोड, रामेश्वर मुळे, प्रवीण आडे, गजानन पवार, पंडित चव्हाण, वरून जाधव, शिवाजी चव्हाण, सुनीता पवार, प्रवीण राठोड, पी. एन राठोड हे उपस्थित होते.