विरोधी पक्षनेत्यांची दुटप्पी भूमिका?

 विरोधी पक्षनेत्यांची दुटप्पी भूमिका?


 मागील काही दिवसांपासून संपूर्ण भारत देश हा नैसर्गिक आपत्तीत छायेत अडकलेला आहे मग गेल्या वर्षी आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात कोल्हापूर, सातारा, सांगली या ठिकाणी झालेली ढगफुटी व त्यानंतर संपूर्ण भारतामध्ये किंबहुना महाराष्ट्रात देखील Covid 19 सारखा महामारीचा आजार ( चिनच्या वुहान शहरातुन पसरलेला ) पसरला आणि संपूर्ण देश कुलूप बंद म्हणजेच लाॅकडाऊन करावे लागले. त्याच वेळी केंद्रीय सत्तेत असणारे या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी PM Care Found  नावाचे एक आपत्ती काळात मदत निधी गोळा करण्यासाठी एक वेगळे अकाउंट काढले गेले त्याच वेळी महाराष्ट्र राज्याने देखील महाराष्ट्रातील लोकांना मदत मिळाली या उद्देशाने CM Care Found नावाने अकाउंट तयार केले गेले. 

पण या पुरोगामी महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी या नावाने ओळखला जाणारा 


भारतीय जनता पार्टी ह्या पक्षातील अनेक नेते, त्यामध्ये महाराष्ट्राचे सद्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन इ. व यांसारखे या पक्षाचे अनेक नेत्यांनी असे आव्हान केले होते की, महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते, माजी मंत्री तसेच सजग नागरिकांनी कोरोना महामारी वर लढण्यासाठी सर्वांनी केद्र सरकारला मदत करावी. म्हणजेच PM Care Found मध्ये पैसा जमा करावा. हे सर्वच नेते राहत होते महाराष्ट्रात आणि राहतात देखील महाराष्ट्रातच मात्र मदत केंद्र सरकारला करायला सांगत होते नकी CM care found ला मदत केली. 

    महाराष्ट्रावरील पहिले संकट टळलेले नाही तो पर्यंत दुसरा संकट उभा राहिलेला आहे तो म्हणजे परतीच्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे शेतीतील झालेले नुकसान. त्यातच केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्याचे जीएसटी चे थकलेली रक्कम. आता शेतकरी नैसर्गीक आपत्तीमुळे अडचणीत सापडलेला असताना महाराष्ट्रातील सर्वच पक्षांचे नेते शेतकऱ्यांच्या बांधावर जावुन पाहणी करत आहेत. कोणी छोटे खाणी मदत करताहेत तर कोणी राजकारण.  केद्र सरकार देखील यात राजकारण करत असल्याचे दिसून येत आहे. केद्र सरकार महाराष्ट्राला या नैसर्गिक आपत्तीत एक छदामही देत नाही दुसरीकडे मात्र तेलंगणा व बिहार सारख्या राज्याला मदत करतो. त्याच पक्षाचे महाराष्ट्रातील नेते म्हणजे सद्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पण शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सांगताहेत की केद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारने मदत करावी. अहो देवेंद्र फडणवीस राज्य सरकार मदत तर करेलच त्यात दुमत नाही. पण तुमची भूमिका महाराष्ट्राच्या हिताची नाही हेही लक्षात असु द्या.


   तुम्ही ज्याप्रमाणे Covid19 च्या वेळी केंद्राला मदत करावी अशी भुमिका घेतली होती; तशीच आता केंद्राला पण विनंती करावी की या नैसर्गिक आपत्तीत महाराष्ट्रला मदत करावी. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी अशी दुट्टपी भुमिका घेऊ नये. आपत्तीच्या काळात निधी देताना केंद्राला द्यावे व आपत्ती काळात शेतकऱ्यांना मदतनिधी देताना फक्त राज्यांने द्यावी. 


बळीराम शेषेराव चव्हाण

९०२८४४६९४२

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बंजारा समाजाला ST आरक्षण मिळावे

सावित्री ज्योती व आजच्या स्त्रिया

कृषी क्रांतीचे जनक वसंतराव नाईक