सर्वच राष्ट्रीय पक्षांनी लोकसभेला बंजारा समाजातील उमेदवार न दिल्यास गोरबंजारा समाज वेगळा निर्णय करणार...?

 लोकसभा

बुलेटिन क्रंमाक- 5

सर्वच राष्ट्रीय पक्षांनी लोकसभेला बंजारा समाजातील उमेदवार न दिल्यास गोरबंजारा समाज वेगळा निर्णय करणार...?


बंजारा बहुल मतदार संघात अपक्ष उमेदवार उभे करणार!

१) यवतमाळ- वाशिम प्रा. प्रवीण पवार

२) हिंगोली- प्रा. कैलास राठोड

 ३) बीड -रविकांत राठोड 

४) जालना- राजेशभाऊ जालनेकर 

          आणि 

५). नांदेड- सुरेश राठोड.


✍️ याडीकार पंजाबराव चव्हाण पुसद - 9421774372


••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

    लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता केंव्हाही लागु शकते... मागच्या आठवड्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी यवतमाळ येथील सभेत लोकसभा निवडणुकीचे संकेत दिले. परंतु भाजपा पक्षाकडून लोकसभेची उमेदवारी कोणाला हे त्यांनी जाहीर केले नाही. यावरून सर्वच राष्ट्रीय पक्षांनी लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करतांना सावध पवित्रा घेत आहे.कारण विरोधी पक्षाचा उमेदवार कोणता येतो याची वाट सर्वच पक्ष पाहात असुन कोणत्याही परिस्थितीत यवतमाळ -वाशिम, हिंगोली, नांदेड ,आणि जालना मतदारसंघात गोरबंजारा समाजातील उमेदवार न देण्याचाच विचार केल्याचे कळते. परंतु बिड लोकसभा मतदारसंघात मा.शरद पवार साहेबांनी बंजारा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष रविकांत राठोड यांना राष्ट्रवादी काँग्रेस कडून उमेदवारी जवळ जवळ निश्चित केल्याची गोपनीय माहिती आहे. महाविकास आघाडीमध्ये यवतमाळ -वाशिम लोकसभा मतदारसंघ हा शिवसेना (उबाठा) गट आणि महायुती मध्ये शिवसेना (शिंदे) गटाला सुटली आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून भावनाताईं गवळींना टिकीट जवळपास फायनल असुन याठिकाणी महाविकास आघाडीकडुन जर सौ.मोहीनीताई इंद्रनील नाईक यांना उमेदवारी दिली तर प्रचंड सामना होऊ शकतो..पण शिवसेना उबाठा गटाकडून मागील अनुभव पाहता गोरबंजारा समाजातील लोकांना उमेदवारी देण्याची शक्यता दिसत नाही.कारण मागच्या आठवड्यात शिवसेना नेते मा .संजय राऊत , मा.अरविंद सांवत आणि मा.उद्धवजी ठाकरे यांची शेगांव दौऱ्यावर असतांना भेट घेतली असता त्यांच्या मनात वेगळेच काहीतरी चालु असल्याचे त्यांच्या भेटी दरम्यान दिसुन आले. शब्द दिला पण ते सुद्धा लोकसभेला उमेदवारी देण्यास अनुकूल नाही.

      सर्वच राष्ट्रीय पक्षांनी भारतात असलेल्या 15 कोटी आणि महाराष्ट्रातील 1.5 कोटी असलेल्या बंजारा समाजातील लोकांना पाहिजे त्या प्रमाणात राजकीय वाटा दिलेला नाही...ते आपण पाहू...या!


काँग्रेस पक्ष :-

      १३५ वर्ष जुन्या असलेल्या काँग्रेस पक्षाने महानायक वसंतराव नाईकसाहेबांना १९५२ मध्ये तिकीट दिले आणि नाईकसाहेब भरघोस मताने निवडून आले होते. त्यावेळी नाईकसाहेबांनी आपल्या साडेअकरा वर्षाच्या मुख्यमंत्री काळात काँग्रेस पक्ष महाराष्ट्रातील घराघरात पोहचवला. पण कोणतेही कारण नसतांना त्यांच्यावरही तडकाफडकी राजीनामा देण्याची वेळ आणली . त्यांनतर जलनायक सुधाकरराव नाईकसाहेब यांनी सुद्धा शिवसेनेचे 12 आमदार फोडुन काँग्रेस पक्ष मजबूत केला होता. परंतु त्यांना सुद्धा राजीनामा देण्याची पाळी काँग्रेसने आणली.बंजारा समाजाला पाहिजे त्या प्रमाणात काँग्रेसने राजकीय वाटा दिला नाही.सत्तर वर्ष सत्तेत असलेला काँग्रेस पक्षाने कधीही राष्ट्रपती,उपराष्ट्रपती, राज्यसभेच्या एक ही जागा बंजारा समाजातील लोकांना दिली नाही .. या महिन्यात राज्यसभेच्या 56 जागेसाठी निवडणूक झाली. पण महाराष्ट्रातुन बंजारा समाजातील लोकांना उमेदवारी दिली नाही. तसेच महाराष्ट्रात विधानसभेच्या राज्यपाल नियुक्त 31 जागा खाली आहेत. त्यावरही बंजारा समाजातील उमेदवारी देईल अशी शक्यता दिसत नाही. अशा अनेक कारणांमुळे काँग्रेस पक्षाकडे बंजारा समाजातील लोकांनी पाठ फिरवली म्हणून काँग्रेस पक्ष सत्तेतून बाद झाला. जर काँग्रेस पक्षाला बंजारा समाजाची मते हवी असेल तर त्यांनी किमान काँग्रेस पक्षातून एक तरी सीट बंजारा समाजाला द्यावी.

भाजपा पक्ष :-

     भाजपा पक्षाने लोकनेते मुंडे साहेबामुंळे हरीभाऊ राठोड यांना खासदाराची उमेदवारी दिली ते निवडून आले .पण काही दिवसांनी त्यांची कोंडी होऊ लागली आणि त्यांनी काँग्रेस सोबत जागंडबुत्ता करून ते काँग्रेसवासी झाले. आणि आज ते बहुपक्षवादी आहेत. आणि यवतमाळ -वाशिम लोकसभा निवडणुक अपक्ष लढविण्याच्या तयारीत आहे.

त्यानंतर भाजपाने नाईक घराण्यात आपरेशन कमळ करून एड. निलयभाऊ नाईकसाहेब यांना जवळ केले. नाईकसाहेबांचा नातु म्हणून प्रचार करणाऱ्या भाजपाने ते लायबल असतांना सुद्धा त्यांना मंत्रिपद दिले नाही. ही फार मोठी शोकांतिका आहे. म्हणजे भाजपाची नीती ही घर फोडण्याची असून सन्मान करण्याची नाही. आतापर्यंत मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये उच्च विद्याविभूषित एडवोकेट निलयभाऊ नाईकसाहेब यांना मंत्रिपद का दिले नाही? . असा सवाल गोरबंजारा समाजातील विचारवंत करत आहे. महाराष्ट्रातील 32 जागा लढवणाऱ्या भाजपापक्षाने महाराष्ट्रात एक तरी बंजारा समाजाचा उमेदवार लोकसभेला द्यावा. तरच भाजपासोबत गोर बंजारा समाज राहील अशी सर्वत्र चर्चा आहे.

शिवसेना (उबाठा) पक्ष :- 

      शिवसेना पक्ष यवतमाळ मध्ये वाढविण्यासाठी मा.संजयभाऊ राठोड यांनी अहोरात्र मेहनत घेतली. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना मंत्रिपद देण्यात आले. परंतु मा . शरद पवार साहेबांच्या राजकीय खेळीमुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. शिवसेना उबाठा हा पक्ष जुना असूनही त्यांनी 288 उमेदवारापैकी मा. संजयभाऊ राठोड सोडले तर महाराष्ट्रामध्ये गोरबंजारा समाजाला कुठेही सिटा दिलेल्या नाही. आणि यावेळी सुद्धा यवतमाळ -वाशिम लोकसभा बंजारा बहुल मतदार संघ असताना आणि त्यांच्याकडे लायबल उमेदवार असताना सुद्धा त्यांनी बंजारा समाजाचा उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे गोरबंजारा समाज सुद्धा शिवसेना उबाठा गटाकडे पाठ फिरवल्याशिवाय राहणार नाही. अशीच सर्वत्र चर्चा दिसून येत आहे. जवळपास 22 लोकसभा सिट्या लढवणाऱ्या शिवसेना उबाठाकडून महाराष्ट्रात एक तरी बंजारा समाजाला सीट द्यावी अशीच बंजारा समाजाची इच्छा आहे.

शिवसेना (शिंदे ) गट :- 

     महाराष्ट्रामध्ये राजकीय घडामोडींना वेग येऊन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी जवळपास 40 आमदार घेऊन भाजपाशी युती करून ते मुख्यमंत्री झाले. त्यांच्याबरोबर गोरबंजारा समाजाचे एकमेव नेतृत्व मा. संजयभाऊ राठोड सुद्धा होते. त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले परंतु येणाऱ्या यवतमाळ -वाशिम लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना उमेदवारी देण्यात यावी. अशी गोरबंजारा समाजामध्ये जोरदार मागणी असली तरी सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये शिंदे गटाकडे असलेल्या हिंगोली आणि यवतमाळ -वाशिम लोकसभा मतदार संघातील या दोन सिटा भाजपाकडे जाणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे. मा . संजयभाऊ राठोड हे यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचे दमदार कॅन्डीडेट असताना त्यांना उमेदवारी का नाही? असाही प्रश्न गोरबंजारा समाजामध्ये पडलेला आहे. तरी शिवसेना शिंदे गटाकडून एक तरी गोरबंजारा समाजाला लोकसभेची उमेदवारी द्यावी अशी आशा लावून गोरबंजारा समाज बसलेला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष :- 

     मा.शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जलनायक सुधाकरराव नाईकसाहेब यांच्या पासुन मा .मनोहरराव नाईकसाहेब असुन आता एड इंद्रनील नाईक आहेत. परंतु त्यांना सुद्धा मंत्रीपद दिले नाही . एकंदरीत सर्वच राष्ट्रीय पक्षांनी गोरबंजारा समाजाच्या लोकांना राजकीय वाटा दिलेला नाही. आणि नाईक घराण्याचे वारस असताना सुद्धा महाविकास आघाडीमध्ये एडवोकेट इंद्रनीलभाऊ नाईक यांना मंत्रिपद सुद्धा दिलेले नाही. त्यामुळे समाज नाराज झाला होता आणि आजही आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे बंजारा चेहरा म्हणून यवतमाळ मध्ये हरीश चव्हाण आणि बीडमध्ये रविकांत राठोड हे नवतरुण असल्यानंतरही यवतमाळची सीट जरी महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उबाठा ठाकरे गटाला गेलेली आहे तरी बीड लोकसभा मतदारसंघाची सीट ही महाविकास आघाडीमध्ये शरद पवार गटाकडे आलेली असताना मा. शरद पवार साहेबांनी जर बीडमध्ये रविकांत राठोड यांना उमेदवारी दिली तर ते बंजारा समाजाचे पहिले निवडून येणारे उमेदवार ठरेल. परंतु त्यांचाही नावाचा विचार गांभीर्याने होण्याची गरज आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) :- 

       मा. अजित दादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करून ते जवळपास 35 आमदार घेऊन त्यांनी भाजपासोबत युती केली आणि ते स्वतः उपमुख्यमंत्री झाले. या सर्व राजकीय घडामोडी मध्ये नाईक घराण्याचे वारसदार एडवोकेट इंद्रनीलभाऊ नाईक यांनी सुद्धा अजित दादा सोबत राहणे पसंत केले. सर्वांना मंत्रिमंडळ विस्तारामध्ये एडवोकेट इंद्रनीलभाऊ नाईक यांना मंत्रिपद मिळेल अशी आशा होती. परंतु ती आशा फोल ठरलेली आहे. नाईक घराण्याचे वारस असताना सुद्धा अजितदादा गटाकडून त्यांची मंत्रिमंडळामध्ये एन्ट्री न होणे ही गोरबंजारा समाजासाठी फार मोठी शोकांतिका आहे. आणि यवतमाळ- वाशिम लोकसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना (उबाठा) गट आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यामध्ये कलगीतुरा सुरू असून विनर कॅडेट म्हणून सौ. मोहिनीताई इंद्रनील नाईक यांच्याकडे आज मतदारसंघ पाहतो आहे. त्यांना तिकीट जर दिले तर त्या निवडून येऊ शकतात. त्यांना तिकीट का देण्यात येत नाही? असा सवाल गोरबंजारा समाज करत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी मधून यवतमाळ वाशिम हिंगोली बीड नांदेड आणि जालना या मतदार संघाकरिता गोर बंजारा समाजातील उमेदवार देण्यात यावा अशी मागणी जोर धरत असून प्रत्येक पक्षाकडे दहा दहा सक्षम उमेदवार असतानाही एकाही राष्ट्रीय पक्षाने लोकसभेला गोरबंजारा समाजाचा उमेदवार दिला नाही. तर 48 मतदार संघात अपक्ष उमेदवार उभे करून राष्ट्रीय पक्षाला त्यांची जागा दाखवण्याची तयारी गोरबंजारा समाजजातील एक वर्ग करत असल्याची जोरदार माहिती आहे. आणि प्रस्थापित पक्षाला धोबीपछाड करण्यासाठी समनक जनता पार्टी ही मैदानात उतरलेली आहे. त्यामुळे राष्ट्रीय पक्षाने अजूनही वेळ गेलेली नाही गोर बंजारा समाजातील उमेदवाराचा विचार करावा.

     जर भाजपा, शिवसेना (उबाठा) गट, शिवसेना (शिंदे) गट ,काँग्रेस पक्ष ,राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गट, राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा) गट, या पक्षांनी गोरबंजारा समाजाला लोकसभेची उमेदवारी दिली नाही. तर गोरबंजारा समाज आता निर्णायक भुमीकेत आलेला असुन सर्वंच पक्षावर कमालीचा नाराज आहे.त्यामुळे येणाऱ्या लोकसभेसाठी गोरबंजारा समाजातील एकाही उमेदवारांना उमेदवारी दिली नाही. तर गोरबंजारा समाज वेगळा निर्णय करणार-असल्याची जोरदार चर्चा संपुर्ण महाराष्ट्रात असुन जवळपास 43 विधानसभा मतदारसंघ आणि 5 लोकसभा मतदारसंघ हे बंजारा बहुल असल्याने जवळपास लोकसभेच्या 5 मतदारसंघांमध्ये गोरबंजारा समाजाकडून 5 अपक्ष उमेदवार उभे करण्याची दाट शक्यता असून जर यवतमाळ मध्ये प्रा. प्रवीण पवार ,हिंगोली मध्ये प्रा. कैलास राठोड, बीड मध्ये रविकांत राठोड ,नांदेड मध्ये सुरेश राठोड आणि जालन्यामध्ये राजेशभाऊ जालनेकर हे जर अपक्ष उमेदवार उभे राहिले. तर येणाऱ्या लोकसभेचे निकाल धक्कादायक असेल अशी विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे!


बघुया घोडा 🐎 मैदान समोर आहे.

चलो गोर सत्ते की और! 

(सदरील लेख याडीकार पंजाब चव्हाण यांचा आहे.)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बंजारा समाजाला ST आरक्षण मिळावे

सावित्री ज्योती व आजच्या स्त्रिया

कृषी क्रांतीचे जनक वसंतराव नाईक