#तांड्याचा_नायक_ते_महाराष्ट्राचा_नायक
वसंतराव नाईक-----
#जिवन_परिचय:--
महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील #गहुली या गावातील बंजारा समाजातील एका शेतकरी कुटुंबात १ जुलै १९१३ रोजी वसंतराव नाईक यांचा जन्म झाला. आईचे नाव #होनुबाई व वडिल #फुलसिंग नाईक. आणि याच महामानवाचा जन्म दिवस कृषी दिन म्हणुन संपुर्ण महाराष्ट्रात एव्हाना भारतभर साजरा केला जातो..त्यांनी ६ जुलै १९४१ रोजी वत्सला घाटे (ब्राम्हण), नागपूर यांच्यांशी #आंतरजातीय विवाह केला. ते नेहमी बंद गळ्याचा कोट, तोंडात चिरुट, चमकदार सोनेरी चष्मा असा त्यांचा आधुनिक पध्दतीचा राहणीमान कारण वसंतराव नाईक यांच्यावर #महात्मा_फुले, डेल कार्नेन तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार #डॉ_बाबासाहेब_आंबेडकर यांचा प्रभाव होता.
बंजारा समाजातील पहिले वकिल तसेच पुसद नगरपालिकेचे अध्यक्ष, मध्यप्रदेशाचे महसूल खात्याचे उपमंत्री, महाराष्ट्राचे सहकार मंत्री, कृषी मंत्री, महसूल मंत्री याशिवाय सर्वाधिक काळ मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. विरोधी पक्षांचा आदर करणारा माणूस असा हा त्यांचा जिवन प्रवास..
#मला_घडविण्यामध्ये_माझ्या_आई_वडिलांचा_माझ्या_भावांचा_माझ्या_जनतेचा_जेवढा_वाटा_आहे_तेवढाच यशवंतराव चव्हाण यांचा आहे".
#बंजारा_समाजाविषयी_भुमिका:-
"#माझ्या_आईपेक्षाही_मला_समाज_अधिक_प्रिय_आहे"
अशी भूमिका अंगाशी बाळगून सातत्याने विरोधकांचा बिमोड केला. तसेच त्यांना समाज कार्याची आवड लहानपणापासूनच त्यांच्या वडिलांकडून मिळाली होती. वसंतराव नाईक यांचा समाजातील #रुढी_परंपरा आणि #अंधश्रद्धेवर विश्वास नव्हता. तसेच ते बंजारा समाजातील स्त्रियांच्या पोशाखात बदल करण्याबद्दल ते नेहमी आग्रही होते. तसेच ते #दारुबंदीच्या कार्यक्रमाचा शुभारंभ त्यांनी आपल्या गावापासून केला तसेच भटक्या विमुक्त जाती आणि जमातीच्या मुलांना चांगले शिक्षण घेता यावे या उद्देशाने त्यांनी महाराष्ट्रात एकूण ७०० #आश्रम_शाळा सुरू केल्या होत्या ( पण आज त्यांची स्थिती ). त्यांनी कोणताही नवीन बदल घडवून आणताना पहिले स्वत: पासुन करायचे.
#शेती_विषयक:--
"#शेतकऱ्यांला_पाणी_मिळाले_की_तो_चमत्कार_करून_दाखवतो"
महाराष्ट्रासाठी केंद्राकडे एकच कृषि विद्यापीठाची तरतुद असतांना त्यांनी एकुण चार कृषी विद्यापीठ महाराष्ट्राला देऊन प्रादेशिक असमतोल दूर केला. तसेच ते १९६३ साली पहिल्यांदा मुख्यमंत्री पदी विराजमान झाले त्यावेळी महाराष्ट्रात दुष्काळ पडला होता. व त्यांच्या ११ वर्षाच्या कार्यकाळात पाच मोठे दुष्काळ त्यांनी अनुभवले यामुळे अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली होती त्यावेळी त्यांनी पुण्याच्या शनिवारवाडा येथील भाषणात असे ठामपणे सांगितले की, #येत्या_दोन_वर्षांत_महाराष्ट्र_अन्नधान्याच्या_बाबतीत_स्वयंपूर्ण_करू_शकलो_नाही_तर_मी_स्वत_फाशी_घेईन"
असे सांगितले. शेती आणि शेतकरी हा त्यांचा आवडता छंद किंवा विचार होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शेतजमीणीचे राष्ट्रीयकरण करण्यासंदर्भातील भुमिका त्यांनी कृतीत उतरवली. भारताचे माजी कृषिमंत्री #शरद_पवार एके ठिकाणी सांगतात की, दुष्काळ किंवा आपत्तीशी सामना कसा करावा हे मला वसंतराव नाईक यांच्याकडून शिकायला भेटले..
शेती हा त्यांचा आवडता भाग असल्या कारणाने त्यांनी त्यांच्या काळात औरंगाबाद येथील #जायकवाडी धरण, #उजणी धरण, कोयना धरण, अप्पर वर्धा, पेंच, चास, अरुणावती, कालीसरार दोन यांच्यासह ७० धरणांचा काम वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना केलेले दिसते. महाराष्ट्रातील खेड्यात विज पोहचावी म्हणुन त्यांनी खापरखेडा, पारस, भुसावळ यांसारखे औष्णीक विद्युत केंद्र तसेच पोफळी, वेलदरी सारखे जलविद्युत प्रकल्प उभारले. तसेच आज भारतभर चालु असलेली #रोजगार_हमी_योजना.
आमेरीकेकडुन घेतला जाणारा मिलो नावाचा गहु बंद करून त्यांनी महाराष्ट्रात हरित क्रांती घडवून आणली व त्या माध्यमातून त्यांनी H_4, CSH-1 हायब्रीड ज्वारी या संकरीत बियाणे निर्माण करुन अन्नधान्याची टंचाई दूर केली. तसेच त्यांनी शेतकऱ्यांसाठी #बियाणे_महामंडळ स्थापन केले. इत्यादी अनेक शेती विषयक धोरण वसंतराव नाईक यांनी त्यांच्या काळात राबवले आणि महाराष्ट्रात १९६५ साली #हरित_क्रांती व धवल क्रांती घडवून आणली... त्यामुळे त्यांना ख-या अर्थाने शेतकऱ्यांचा कैवारी असंही म्हणटले आहे..
"#कृषि_क्रांती_ही_रक्त_सांडण्याची_नसुन_घाम_गाळण्याची_आहे".
#इतर_क्षेत्रातील_योगदान:-
औद्योगिक विकास महामंडळ ची स्थापना करून बुटीबोरी-नागपुर, वाळुज-औरंगाबाद, सातपुर, अंबड- नाशिक, इस्लामपूर-सांगली, लातुर इ.औद्योगीक वसाहती तसेच नवीन औरंगाबाद व नवी मुंबई ची निर्मिती, सिडको-हडको, मराठी भाषेला मिळवुन दिलेला राज भाषेचा दर्जा, ग्राम सुधारणा, पंचायत राज, सुतगीरणी, अनुसुचित जाती अनुसुचित जमाती प्रमाणे भटक्या विमुक्त जाती आणि जमाती यांच्यासाठी राज्यात तिसरी सुची १६ (४) ब चा अधार घेऊन या वंचित घटकांना ४ % आरक्षणाचा निर्णय, राज्यातील पहिले खुले कारागृह पैठण येथे सुरू केले, मटका व जुगारांना आळा बसावा म्हणून राज्य शासनाची लाॅटरी सुरू केली इ. अनेक कामे वसंतराव नाईक यांनी त्यांच्या ११ वर्षाच्या कार्यकाळात पुर्ण केली होती. हे सुप्त गुण #यशवंतराव_चव्हाणांनी हेरल्यामुळेच त्यांनी केंद्राला (दिल्ली ) असे सांगितले होते की, #महाराष्ट्र_हा_वसंतराव_नाईकांच्या_हाती_सुरक्षीत_असेल_असा_निर्वाळा_दिला_होता.
या जयंतीनिमित्त प्रत्येकांनी एक असा पण घ्या की या वर्षी मी एक झाड लावणार आणि तो जगवणार देखील...
बळीराम शेषेराव चव्हाण
एम.फिल ( राज्यशास्त्र )
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद.
९०२८४४६९४२

अभिनंदन बळीराम 💐💐💐
उत्तर द्याहटवावसंतराव नाईक यांचे समाजातील योगदान मांडणारा अप्रतिम लेख👌👌
उत्तर द्याहटवाKhup chan mama.
उत्तर द्याहटवा