भारताचा खरा चौकीदार
#चौकीदार_चोर_का_आहे_??
भारताला स्वातंत्र्य मिळुन ७० वर्ष उलटून गेले. या ७० वर्षाच्या काळात अनेक पक्षांची सत्ता आली आणि गेली देखील... पण या व काळामध्ये सर्वाधिक काॅग्रेस हा पक्ष सत्तेवर राहिलेला दिसुन येतो. आणि त्यानंतर जनता पक्ष व भाजपा असे काही पक्ष आहेत की ते केंद्रीय सत्ता उपभोगलेली दिसुन येते..
पण आपण २०१४ पासुन ते सद्याच्या भाजप सरकारकडे पाहिले तर अशी वेगळीच भूमिका तयार होवू लागते. जे की २०१४ ला भाजप विषयी जो आपलेपणा,जिव्हाळा किंवा त्याला आपण Attractions होतं ते आता तरी दिसुन येत नाही..
#याचे_कारण_अनेक_आहेत--
१) #शेतकऱ्यांचा_नेहमीच_केला_जाणारा_अपमान-- जेव्हापासून भाजप सरकार सत्तेवर आला आहे तेव्हापासून या शासनातील अनेक विद्वान नेते रावसाहेब दानवे, एकनाथ खडसे व केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग असो की उत्तर प्रदेश मधील अनेक बाहुबली नेते या नेत्यांनी नेहमीच शेतकऱ्यांच्या बाबतीत अक्राळ विकाळ बोलेलं आपल्याला दिसुन येते....
२) #बेरोजगारांची_संख्या_वाढवली---
हा भाजप सरकार सत्तेवर आला तो भारतीय युवांच्या जोरावर यांचे कारण असं होतं की, याने आश्र्वासन दिले होते की आम्ही वर्षाला २ कोटी रोजगार उपलब्ध करून देवू. पण प्रत्यक्षात यांच्या उलटी परिस्थिती झालेली दिसते. २०१६ साली नोटाबंदी केला आणि अनेक कामगार हे बेरोजगार झालेले दिसुन येते..( पण भक्तांना ते दिसत नाही ते स्वत:ही बेरोजगार होवुन )
३) #काॅग्रेस_सरकारच्याच_योजना_नाव_बदलुन_पुढे--
या भाजप सरकारने मात्र या ठिकाणी लोकांना फार येड्यात काढलेला दिसून येते. कारण ज्या योजना पुर्वीच्या सरकारने चालु केल्या होत्या त्याच नाव बदलून पुढे चालू ठेवल्याचे दिसते उदा:- उच्च शिक्षणात मिळणारी फेलोशिप याला पुर्वी राजीव गांधी नॅशनल फेलोशिप असं होतं पण या शासनाने त्यालाच मोडतोड करून नॅशनल फेलोशिप असं नाव देवून टाकलं..इ अनेक योजना आहेत की त्याचे याच प्रकारे नाव बदलण्यात आले..
४)#शिक्षणाचा_बजेट_कमी_करुन_कुंभमेळ्याचा_बजेट_वाढवला----
पुर्वीच्या सरकारच्या तुलणेत या शासनाने साधु,संत, महाराज-गांजा ओढणारे (सगळे बलात्कारी पुरुष ) यांना मानधन महिन्याला चालु केले. पण जो देशाचा भविष्य आहे शिक्षण या गोष्टीचा विचार मात्र या शासनाने कुठेच केलेला नाही.. यांनी साधु संतांच्या तुलणेत शिक्षणाला दुय्यम स्थान दिला आहे....
५) #मंदिर_प्रेम_अधिक---
तसंही हा भाजप पक्ष स्थापन झाल्यापासून या पक्षांचा मुळ अजेंडा हा राम मंदिर राहिलेला आहे. म्हणजे पक्ष स्थापन झाल्यापासून ते म्हणताहेत की अयोध्येत आम्ही राम मंदिर बांधु पण कधी जेव्हा स्पष्ट बहुमत मिळेल तेव्हा..२०१४ ला बहुमत होते पण यांनी तो केला का तर नाही... आणि होणार ही नाही कारण एका अमेरीकन संस्थेने स्पष्ट केले की, या जागेवर पुर्वी बौद्ध विहार होते...
६) #काश्मीरचा_प्रश्न_तेवत_ठेवणे_३७० व ३५ अ रद्द करणे---
मंदिराच्या प्रश्नाबरोबर या शासनाने नेहमीच सांगत आलेत आम्ही बहुमतात आलो तर कलम ३७० आणि ३५ अ रद्द करू पण हे प्रत्यक्षात ते करुच शकणार नाही. कारण जेव्हा मनमोहनसिंग पंतप्रधान होते त्यावेळी व त्याच्या अगोदरही अशी दोन वेळा संसदेत ठराव मांडला होता पण याच भाजपाने दोन्ही वेळा या कलमाला विरोध केला. त्यामुळे अंध भक्तांनी असे समजू नये की हे कलम रद्द होतील...
७)#शिक्षण_आरोग्य_रेल्वेचे_विमानतळ_खाजगीकरण_BSNL --
काॅग्रेस सरकारने जेवढं खाजगीकरण केले नाही त्यापेक्षा अधिक खाजगीकरण या शासनाने केला आहे..शिक्षण फिस वाढवली KG To PG ची, चांगल्या आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आली नाही, रेल्वेचे ५ वर्षात अनेक वेळा भाडे करून कंपनी ला भाडेतत्त्वावर चालविण्यास देणे, तसेच रीलायन्स सारखी कंपनीला ९९ वर्षाच्या काळासाठी पाच विमानतळ विकले, तसेच शासकीय BSNL ही कंपनी दिवाळखोरीत काढून प्रायव्हेट Jio ला चालना दिली..
८) #सैनीकांचा_राजकारण---
या शासनाला विकास दाखवता येत नसल्या कारणाने मोदी सरकारने पुलवामा हल्यात शहीद झालेल्या जवानांना मतदान करा असे आवाहन करत आहेत...म्हणजे काॅग्रेसने जे आतापर्यंत केले नव्हते ते सर्व युक्ति या शासनाने वापरत आहे...
याशिवाय अनेक असे खुप मुद्दे आहेत की ज्यामध्ये #राफेलघोटाळा_शेतकरीविमा घोटाळा, अर्वाच्यपणा, मुस्लीमांना विनाकारण टार्गेट करणं आणि उच्च वर्णीयांना वेगळी वागणूक, शिष्यवृत्ती योजना बंद, फेलोशिप बंद, आरक्षण बंद-१३ रोस्टर प्रणाली, #परराष्ट्रधोरणात अपयश, एक छत्री अमंल प्रस्थापीत करण्याचा प्रयत्न-- मंत्र्यांना बोलण्याचा अधिकार नाही...एव्हाना त्याच पक्षांच्या खासदारांना देखील विरोधात बोलता येत नाही; एक प्रकारची दहशत, गोमांसाच्या नावाखाली दलीत, मुस्लिमांवर आत्याचार-- आणि गोमांस निर्माण व निर्यात करण्यात यांचेच मित्र अघाडीवर, #मागीलचार_वर्षात_कर्जाचा_बोजा_अधिक पटीने वाढला.....
बलात्कारी नेते याच पक्षातुन पुढे आले तसेच एका फोनवर मुलांना पोरी आणुन देणारे राम कदमांसारखे नेतेही निर्माण झाले. असा कोणताच भाग या शासनाने शिल्लक ठेवला नाही की त्याचे सत्त्यानाश नाही केले....
त्यामुळे येणाऱ्या काळात जपुन राहायचे असेल तर या शासनापासुन चार हात लांब राहिलेला बरा असं मला तरी वाटते...
बाकी तुम्ही सुज्ञ आहात यात तिळमात्र शंका नाही...
बळीराम शेषेराव चव्हाण
एम.फिल
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद.
९०२८४४६९४२


अभिनंदन 💐💐💐👏👏👏
उत्तर द्याहटवाबळीराम खूप सुंदर लिहिले लिहित राहा.....
Thanks sir,But Ankhi jast mahiti nahe yatal
हटवाsir
मोदी आणि भाजपा चे 2014 नंतरचे राजकिय वास्तव खुप मुद्देसूदपणे मांडले आहे💯👌
उत्तर द्याहटवाThanks
हटवा