नवरात्रीतील अंधश्रद्धा..

 नवरात्रीतील अंधश्रद्धा....

      आज आपण २१ व्या शतकामध्ये जगत आहोत, संपूर्ण जग हा चंद्रावर जाण्याच्या तयारीत आहे आणि आमचा भारत देश अंधश्रद्धेचा कळस पार करत आहे.  कारण भारतीय समाज व्यवस्था ही मुळातच मनुवादी विचारसरणीवर आधारीत आहे. याचे कारणही तसेच आहे. या भारत देशात वर्णव्यवस्था होती आणि या वर्णव्यवस्थेनुसार फक्त ब्राम्हणांना शिक्षणाचा अधिकार होता त्याचा परिणाम असा झाला की समस्त बहुजन समाज हा अशिक्षीत राहिला. आणि समाज अशिक्षित राहिलेल्या कारणांमुळे भटांनी या समाजावर जे काही विचार लादले गेले ते विचार आजही समस्त बहुजन समाज सोडायला तयार नाही. यांच्या मनामध्ये जात-पात, देव - धर्माचा व अंधश्रद्धेचा भुत डोक्यात फिट्ट करुन ठेवलेला आहे आणि हे लोकही त्याला uninstall करायला तयार नाही. 

       प्रत्येकाने देवावर श्रद्धा ठेवावी किंवा न ठेवावी हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. सद्या देशभरात नवरात्र महोत्सव हा आनंदाने  साजरा केला जातोय, तरी या वर्षी कोरोना महामारीच्या कारणांमुळे 'दांडीया' ला कुठेतरी ब्रेक लागलेला दिसुन येतो. (त्यामुळे अनेक व्यवसायीक देखील तोट्यात आहे) नवरात्र महोत्सव म्हणटले की पाच गोष्टी ह्या प्रामुख्याने आपल्या डोळ्यासमोर येतात, 


१) उपवास २) चप्पल न घालणे (अनवाणी पाय) ३) ९ दिवस ९ रंगाच्या साड्या ४) दांडीया ५) देवीच्या दर्शनासाठी पायी चालत जाणे इ. गोष्टी सरासपणे होतातच. 

      या नवरात्रीत महिला वर्ग हा सर्वाधिक प्रमाणात उपवास करताना आपल्याला दिसुन येते. तसेच आपण बघतो की, लोक हे देवीच्या नावाने उपवास करतात.. पण त्यांना हे माहीत नाही की या देशात किंबहुना महाराष्ट्रात असे अनेक लोक आहेत की त्यांना एक वेळेचाही व्यवस्थित पणे जेवण मिळत नाही, हे लोक रोज रात्री उपाशी असतात तरी त्याचं दुःख कमी झालेला नाही. मग तुम्ही उपवास केल्याने देवी पावणार आहे का ? आणि असं जर असतं तर भारतात दररोज लाखो लोक उपाशी राहीले असते का? 

    आज प्रत्येक कोठेही गेलात की असं जाणवत आहे  १०० पैकी ६० ते ७० लोक ही देवीच्या नावाने चप्पल घालत नाहीत नवरात्रीचे नऊ दिवस अनवाणी पायाने चालत असतात ही श्रद्धा की अंधश्रद्धा ?? जर का कोमताही माणूस चप्पल न घालता देवी पावत असेल तर ती देवी होवूच शकत नाही. कारण कोणत्याही देवाला असं वाटत नाही की त्यांच्या भक्तांनी असं काही करावं. जर चप्पल न घालता सर्व दु:ख दुर झाले असते तर वर्षानुवर्षांपासून चप्पल न घालायला मिळणारे शेतकरी ही या देशात आहे.. परंतु त्यांचे आजुन तरी दु:ख कमी झालंय हे दिसत नाही....

       त्यानंतर अजून एक अंधश्रद्धा अशी आहे की, या नवरात्रीत ९ दिवस महिला ह्या ९ रंगाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या घालत असतात त्यामुळे देवी आनंदी आनंद होते असं ही अंधश्रद्धा आहे. जर का ह्या महिलांना वाटत असेल की, देवी आपल्यावर खुश व्हावी तर या महिलांनी गरीब महिलांना आपल्या कपाटातील ९ दिवस ९ गरीब महिलांना साड्या बिनधास्त द्यावी नक्कीच देवी प्रसन्न होईल. त्यानंतरचा नवरात्रीतला दुसरा प्रकार दांडीया/गरबा गुजराती खेळ हाही खूप मोठ्या प्रमाणात प्रसारीत होत आणि ९ दिवस यात तरुण-तरुणी बेधुंद होऊन आनंद लूटत असतात.

        सगळ्यात महत्त्वाचे अंधश्रद्धा ती म्हणजे,  लोक हे नवराञी मध्ये देवीच्या दर्शनासाठी चालत १०० km किंवा त्यापेक्षा कमी किंवा जास्त अंतर हे पायी चालत जातात.  काय कारण तर देवी नवसाला पावते या उद्देशाने पण या वेड्या लोकांना कोण सांगणार की, बाबांनो देवी चालत जावून पावत नाही...

तर ती तुमच्या आजूबाजूच्या स्ञियांना मध्ये पहा त्यातच तुम्हाला दुर्गा देवीचा प्रत्यय येईल. देवीचा अंश हा प्रत्येक स्ञी मध्ये आहे (फक्त तिला बलात्कार करून अपमानास्पद वागणूक देऊ नका ) तुम्ही त्यांना योग्य मानसन्मान द्या तुम्हाला देवी नक्कीच पावेल... 

( देवी ही चप्पल पाळुन, उपवास करून, पायी चालत जावून ) कधीच दर्शन देत नाही. ज्या दिवशी तुम्हाला माणसातला देवमाणूस दिसेल त्या दिवशी कोणत्याही देवा-यात जाऊन देव- देवी शोधण्याची गरज भासणार नाही. त्यावेळी तुम्हाला प्रत्येक व्यक्तीमध्ये देव आणि प्रत्येक स्ञीयांमध्ये देवी नक्कीच दिसेल....

      तर आज पासून अंधश्रद्धेचा भुत डोक्यात काढुन टाकुया आणि विज्ञानवादी जिवन जगुया...

बळीराम शेषेराव चव्हाण

९०२८४४६९४२

टिप्पण्या

  1. या अंधश्रद्धेपेक्षा देवीच्या नावावर बकऱ्याची बळी देणे ही आपल्या समाजात चालू असलेले सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे असं मला वाटतं.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बंजारा समाजाला ST आरक्षण मिळावे

सावित्री ज्योती व आजच्या स्त्रिया

कृषी क्रांतीचे जनक वसंतराव नाईक