महाज्योतीच्या प्रतीक्षेत संशोधक विद्यार्थी.



बार्टी आणि सारथी च्या धर्तीवर आधारित भटक्या विमुक्त आणि ओबीसी समाजाच्या शिक्षणासाठी जाहीर झालेली महाज्योती माय बाप सरकार कधी लागु करणार?



महाज्योती ही योजना महाराष्ट्र शासनाने भटके-विमुक्त, इतर मागास वर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थी हित समोर ठेवून आपण १) समाजीक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्र. आस्थाप्र-२०१७/२६४/आस्था-१,दि.२५/०६/२०१९.
२) विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास वर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग, शासन निर्णय क्र. संकिर्ण - २०१९/प्र.क्र. १११/ मावक. दि. ०६/०७/२०१९ वरील शासन निर्णयानुसार दिनांक ८ आॅगस्ट २०१९ रोजी महाज्योती या संस्थेची स्थापना केली.
भटका-विमुक्त समाज हा वर्षानुवर्ष दुर्लक्षित राहिलेला समाज आहे. त्याचबरोबर इतर मागासवर्गीयांचे हीच स्थिती आहे. वरील समूह पैकी अनेक वर्ष जंगलामध्ये भटकत राहणारा समूह हा मागील काही वर्षांमध्ये हळूहळू स्थिर होत आहे. मात्र या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून सातत्याने होणारे दुर्लक्ष आणि त्याचा परिणाम म्हणून हा समाज आजही शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आलेला नाही. याचे कारण , समुदायातील लोकांची उपजीविका ही ऊसतोड कामगार, शेती कामगार, बांधकाम मजूर, शेतमजूर किंवा इतरांच्या शेतावर सालगडी म्हणून राहणे इ. अवलंबून असल्याने त्यांच्या दोन वेळच्या पोटापाण्याचा प्रश्‍न सुटलेला नाही. 
आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना महाज्योती बचाव कृती समिती, महाराष्ट्र यांनी अनेक वेळा निवेदन देऊनही या संस्थेच्या कार्यालयाची जागा धक्की झालेली नाही त्यामुळे ही जाहीरात काढली जात नाही?  कारण ही संस्था स्थापन होऊन एक वर्ष पूर्ण झालेले असतानाही आपण जर या संस्थेची पुढील कार्यवाही करत नसाल तर येणार्‍या काळात भटके-विमुक्त, इतर मागास वर्ग आणि विशेष मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थी रस्त्यावर उतरून आंदोलन देखील करु शकतात याचा भान या माय बाप सरकारला असु नये का? एकीकडे सारथी सारख्या संस्थेला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे १२०० कोटी रूपये देऊन स्वायत्ता देवू शकतात पण महाज्योतीला एक छदामही देत नाही, स्वायत्ता तर दुरची गोष्ट आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठातील संशोधक विद्यार्थीची नजर या महाज्योती योजणेकडे लागलेली आहे.


बळीराम शेषेराव चव्हाण
मो न. ९०२८४४६९४२

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बंजारा समाजाला ST आरक्षण मिळावे

सावित्री ज्योती व आजच्या स्त्रिया

कृषी क्रांतीचे जनक वसंतराव नाईक