मराठवाडा पदवीधर निवडणुक
सद्या संपूर्ण महाराष्ट्रात पदवीधर निवडणूक आणि शिक्षक मतदार संघाची जोरदार तयारी सुरू आहे. आज या निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस. सगळ्या पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आपापल्या परीने प्रचार मोहीम राबवत आहेत. त्यातच या वर्षी मराठवाडा पदवीधर निवडणुकीत एकुण ३८ उमेदवार उभे राहिले आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे मागील दोन टर्म पदवीधर आमदार राहिलेले सतीश चव्हाण, भाजपाचे शिरीष बोराळकर, वंचित बहुजन आघाडीचे प्रा. नागोराव पांचाळ तसेच इतरही पक्षाचे व अपक्ष उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.
या पदविधर निवडणूकीची तारीख १ डिसेंबर रोजी सकाळी ७ ते ५ या वेळेत मराठवाड्यातील ७८ तालुक्यात पार पडणार आहे. मात्र या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला ही निवडणूक जड जात असल्याची अनेकांनी यापुर्वीच सांगितले आहे. या निवडणुकीत प्रामुख्याने सगळ्यात जास्त टीका ह्या भाजप उमेदवारावर झाली आहे. ती टीका अशी की, या उमेदवारांने शासकीय दवाखान्यातील केलेला कंडोम घोटाळा. त्यानंतर सतीश चव्हाणांबाबत वारंवार असे म्हणटले जाते की, त्यांनी मागील १२ वर्षात पदवीधरांना साठी कोणतेही काम केले नाही. त्यात प्राध्यापक भरती असो वा इतर कोणत्याही प्रकारचे कामे केले नाही असा ठपका त्यांच्यावर ठेवला जातो. त्यामुळे त्या पक्षातील अनेक पदाधिकारी नाराज देखील असल्याचे या निवडणुकीच्या प्रचारात बोलले जात असल्याचे समोर येत होते.
तसेच बहुजन, मागासवर्गीयांना नेहमीच डावलले जातात व प्रस्थापित समाज बहुजनांचे नेतृत्व मान्य करत नाही, बहुजनांचे व मागासवर्गीयांचे प्रश्न उपस्थित केले जात नाही. म्हणून वंचित बहुजन आघाडीने आत्यंत मायक्रो घटकातील नेत्याला संधी दिल्याची आपणास दिसून येते. त्यामुळे बहुजन, मागासवर्गीय, ओबीसी व भटक्या विमुक्त समाजातील अनेक छोट्या मोठ्या संघटनांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्राध्यापक नागोराव पांचाळ यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे.
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच भाजपा या पक्षांमध्ये अंतर्गत कलहामुळे कोणत्याही एका नेत्याला स्पष्ट बहुमत मिळेल हे सांगता येणार नाही. कारण ही निवडणूक ही पदवीधर मतदारांची आहे त्यामुळे या निवडणुकीत अंगठे बहादूर लोक नसल्या कारणामुळे जो पदवीधरांचा व संशोधक विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी लावेल त्याचं नेत्याला याठिकाणी बहुमत मिळेल असे बोलले जात आहे.
तसेच प्रहार कडून सचिन ढवळे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. हे उमेदवार स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सर्वात लोकप्रिय उमेदवार म्हणून सद्य परिस्थिती मध्ये दिसून येत आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल हा सचिन ढवळे यांच्याकडे असल्याचा दिसून येतो. तसेच भाजपमध्ये बंडखोरी झालेली आहे. बीडचे रमेश पोकळे पंकजा मुंडे यांचे समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे भाजपातील अनेक मतदारांचे विभाजन होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या तीन तारखेला आपल्या समोर या पदवीधर निवडणुकीचा निकाल लागेल. तोपर्यंत आपणाला स्पष्ट सांगता येणार नाही की, कोणता उमेदवार निवडून येईल. आपण तीन तारखेची वाट पाहू या..
बळीराम शेषेराव चव्हाण
एम.फिल. राज्यशास्त्र
९०२८४४६९४२


छान
उत्तर द्याहटवाखूप छान वर्णन 👌 घटनाकरांनी पदवीधर निवडणूक ज्या उद्देशाने तयार केली तो ऊद्देश सार्थ होईल आणि तसेच उमेदवार निवडून येतील अशी आशा करुया...
उत्तर द्याहटवा