महाज्योती संस्थेकडे सरसगट फेलोशिपची मागणी.

महाज्योती संस्थेकडे सरसगट फेलोशिपची मागणी.

      आज औरंगाबाद शहरामध्ये वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. ॲड. बाळासाहेब आंबेडकर आले असता. महाज्योती बचाव कृती समिती महाराष्ट्र राज्य, औरंगाबाद यांच्या शिष्टमंडळाने महाज्योतीच्या अनागोंदी कारभाराबद्दल व संशोधक विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या छात्रवृत्ति संदर्भात एक निवेदन देण्यात आले.

ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांना निवेदन सादर करताना..

       या निवेदनामध्ये, महाज्योती संस्थेने जी 1 मे 2022 रोजी जाहिरात काढलेले आहे. त्या जाहिरातीमध्ये 52 ते 56 टक्के लोकसंख्या असणाऱ्या ओबीसी, भटके-विमुक्त व इतर विशेष मागासवर्गीय प्रवर्गातील संशोधक विद्यार्थ्यांना फक्त 200 जागा देऊन त्यांची बोळवण केलेली आहे.  तिकडे सारथी सारखी संस्था, बार्टी सारखी संस्था सरसकट विद्यार्थ्यांना फेलोशिप देते; मात्र महाज्योती ही संस्था फक्त 200 जागा काढते. असा हा ओबीसी समाजावरील होत असलेला अन्याय ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या निदर्शनास आणून दिला. महाज्योती संस्थेने या जाहिरातीतील सर्व विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप द्यावी, अशीही मागणी या निवेदनामध्ये करण्यात आली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक नागोराव पांचाळ यांच्या समवेत..

       प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रा. नागोराव पांचाळ तसेच महाज्योती बचाव कृती समितीचे अध्यक्ष बळीराम चव्‍हाण, सदस्य विठ्ठल नागरे, बाळू चव्हाण, आनील वीर, बजरंग वाकोडे व हजारे इत्यादी संशोधक विद्यार्थी हजर होते..



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बंजारा समाजाला ST आरक्षण मिळावे

सावित्री ज्योती व आजच्या स्त्रिया

कृषी क्रांतीचे जनक वसंतराव नाईक