भारतीय पिछडा ओबीसी शोषित संघटनाचे समर्पित आयोगाला निवेदन.
भारतीय पिछडा ओबीसी शोषित संघटनाचे समर्पित आयोगाला निवेदन.
भारतीय पिछडा ओबीसी सोशीत संघटन नई दिल्ली च्या औरंगाबाद विभागाने औरंगाबाद येथे समर्पित आयोगाला ओबीसी राजकीय आरक्षणाच्या अनुषंगाने निवेदन सादर केले. यामध्ये मागासवर्गीय आयोगाने ज्या पद्धतीने UDISE आणि SARAL चा डेटा वापरून सर्वेक्षण केले आणि तो डेटा कोर्टाने स्वीकारला नाही तशा पद्धतीने सर्वेक्षण करू नये. कोणत्याही परिस्थितीत दुय्यम सोर्स च्या माहितीच्या आधारित अहवाल करून सादर करू नये. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे लोकसंख्येच्या प्रमाणात मागासवर्गीयांचे प्रतिनिधित्व व त्यांचे स्थानिक स्वराज्य संस्थानिहाय प्रतिनिधित्व तपासण्यासाठी मतदार याद्या आधार मानून त्यानुसार संख्या निश्चित करून एकूण ओबीसी चे प्रमाण निश्चित करण्यात यावे. यासाठी स्थानिक कर्मचारी जसे तलाठी ग्रामसेवक व बूथ लेवल ऑफिसर्स च्या माध्यमातून अनुभवसिद्ध , समकालीन व कसून मिळवलेल्या माहितीच्या आधारेच अंतिम अहवाल तयार करण्यात यावा. प्राथमिक सोर्स वरील आधारित असलेला अहवाल तयार करण्यासाठी बी .एल. ओ. ची मदत घेऊन लोकल बोडी निहाय ओबीसीच्या सदस्यांची संख्या आणि राजकीय मागासलेपण या संदर्भाने आकडेवारी गोळा करावी.
निवेदन देताना..
१) महाराष्ट्र सरकार ने ओबीसींची जातनिहाय जनगणना तात्काळ करावी
२) बीएलओ च्या माध्यमातुन तात्काळ माहिती गोळा होऊ शकते तसे प्रयत्न करा.
३) १९३१ इंग्रज सरकार जनगणना करु शकते भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार का करु शकत नाही.
४) एस सी आणि एस टी ची जनगणना होते मग ओबीसी साठी एक काॅलम वाढवून जनगणना का केली जात नाही?
त्यासाठी सरकारने पुरेसे मनुष्यबळ व निधी उपलब्ध करुन दिला पाहिजे. तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे.
इत्यादी मागण्या आपल्या निवेदनात मांडल्या आहेत या प्रसंगी संघटनेचे राष्टीय अध्यक्ष सत्वजी माचणवार, विभागीय अध्यक्ष प्रा.सुदाम चींचाने, महासचिव डॉ. कालिदास भांगे, डॉ. वसंत हारकळ, डॉ. प्रभाकर गायकवाड, डॉ. राजू पोपळघट, अमोल वाघमारे, डॉ. मनीषा वंजारी, डॉ. सुभाष जितें, मधुकर हिवाळे, शुभम गावंडे, डॉ. नवनाथ गोरे, पंढरीनाथ झगडे, दिलीप काठोडे, राजेश चिटकुलवार, सखाराम आव्हाड, कृष्णा हजारे, राजाराम शिंदे, जी आर बनसोडे, बळीराम चव्हाण, पंढरीनाथ गाडे,इत्यादी ची उपस्थित होते.


ओबीसी राजकीय आरक्षण टिकवीण्यासाठी सामुहिक लढा देणे आवश्यक आहे
उत्तर द्याहटवाआगदी बरोबर सर..
हटवा