विमुक्त मी पण मुक्त ?

विमुक्त मी पण मुक्त ?

     आज ३१ ऑगस्ट "भटक्या विमुक्त समाजाचा स्वातंत्र दिन"  तसा हा भटका समाज मुळ उत्तर भारतातला. मिठाचा व्यापार करणारी आणि राजा-महाराजांना रसद पुरवणारी जमात म्हणुन ओळखली जाते...

       आज भारत स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष पूर्ण झाली. पण या काळात माझा भटका विमुक्त समाज हा खरचं स्वातंत्र्य झाला का? हा एक प्रश्नच आहे. याचं उत्तर तुम्हा आम्हाला ठाऊकच आहे. ब्रिटिश भारतात येण्यापूर्वी हा भटका समाज आत्यंत सुखी समाधानी होता. त्यांचा व्यापार आणि रसद पुरवण्याचा काम ए्ढ्या पुरती मर्यदीत होता.  पण मोघल असो की निजाम की छञपती शिवाजी महाराज यांच्याशी प्रमाणीक काम करणारा हा भटका समाज होय. निजाम आणि मोघल शाही संपती न संपतीच ब्रिटिश भारतामध्ये आले आणि इथेच राज्य करु लागले. आणि त्यांनी भारतात रेल्वे,तार, दळणवळण इ. ची निर्मिती करुन लागले आणि या आमच्या भटक्या समाजाचा पारंपरिक व्यवसाय अनेक कायदे करून बंद पाडला गेला.  यामध्येच एक कायदा होता #Criminal_Act 1871 मग यातुन प्रश्न तयार झाला तो रोजी रोटीचा. इंग्रज आमच्या वर आन्याय अत्याचार करु लागले, या भावनेतून १८५७ च्या उठावात आमचे भटके आदिवासी समाजामधीलच भागोजी नाईक, उमाजी नाईक इ. अनेक थोर क्रांतिकारकांनी या लढ्यात इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. आणि याच एका कारणामुळे इंग्रजांनी भटक्या समाच्या माथ्यावर Criminal Act नावाचा कायदा लादला. भारतातील एकुण १९८ जातींवर हा कायदा लादला गेला. हा कायदा इतका जाचक होता की, या कायद्यातील एक एक कलम पाहिल्यास आंगावर काटे येतात. या कायद्यान्वे भटक्या समाजातील लोकांना कोठेच एका जागेवर स्थिर राहतात येत नव्हते. त्यामुळे भटक्यांना "ना घरका ना घाट का" असे संबोधले जाते. या कायद्यान्वे कोठेच तीन दिवसांच्या वर राहता येत नव्हते. दररोज पोलीसांकडे हजेरी द्यावे लागत अस. कोठे जायचे असेल तर पोलीसांची परवानगी आवश्यक होतीच, तसेच गाव सोडतांना नाहरकत प्रमाणपत्र तेथील तलाठ्यांकडुन घ्यावे लागत असे इ. अनेक जाचक अटी होत्या. त्यामुळे या समाजाला एका तारेच्या कुंपणामध्ये बंद करण्यात आलेले होते. आणि असे कुंपण संपूर्ण भारतातील अनेक ठिकाणी अस्तित्वात होते उदा:- महाराष्ट्रातील सोलापुर जिल्हा. 

   

Criminal Act.. 1871

 आपला भारत स्वातंत्र्य झाला १५ आॅगस्ट १९४७ रोजी, पण भारतातच राहणारा मुळ भटका आदिवासी समाज यांना या तारेच्या कुंपणातुन बाहेर कोणीच काढले नाही. तत्कालीन कायदामंत्रीे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे होते. तेव्हा ते कायदामंञी म्हणुन काम करत आसताना,  बाबासाहेब यांच्या लक्षात आले की मुळ भारतीय आदिवासी भटका समाज आजही स्वतंञ नाही तो तारेच्या कुंपनात बंद आहे. म्हणुन त्यांनी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निदर्शनास आणून दिले व तो कायदा ३१ आॅगस्ट १९५२ रोजी मोडीत काढण्यात आला किंवा कायदेशीर रद्द करण्यात आला होता. हा कायदा रद्द झाला तेव्हा भारत स्वातंत्र्य होऊन पाच वर्षे पूर्ण झाली होती. म्हणजे भारतीय स्वातंत्र्याच्या पाच वर्षांनंतर या भटक्यांना स्वातंत्र्य भेटले तेव्हा नेहरूनी या असे म्हणटले होते की, आजपासुन तुम्ही विमुक्त झालात म्हणुन या भटक्यांना आपण भटके-विमुक्त असे म्हणतो. तेव्हा भटक्या ह्या ३० तर विमुक्त १४ मुळ जाती महाराष्ट्रात होत्या. म्हणुन भटका समाज हा ३१ आॅगस्ट "विमुक्त दिन","स्वातंत्र्य दिन" म्हणुन साजरा करतो...

     या भटक्या विमुक्त समाजातील सर्व नागरिकांना विमुक्त दिनाच्या हार्दिक शुभेच्छा....💐💐


बळीराम शेषेराव चव्हाण

पीएच.डी राज्यशास्त्र,

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद..

९०२८४४६९४२

टिप्पण्या

  1. खुप सुंदर आणि अभ्यासपूर्ण मांडणी चव्हाण सर अभिनंदन आणि पुढील लेखणासाठी शुभेच्छा

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बंजारा समाजाला ST आरक्षण मिळावे

सावित्री ज्योती व आजच्या स्त्रिया

कृषी क्रांतीचे जनक वसंतराव नाईक