शेतकरी पुत्राची बाजार समितीत भरारी.
शेतकरी पुत्र शेषेराव हिरामण चव्हाण यांनी मागील दोन दशकांमध्ये स्थानिक राजकारणापासून स्वतःच्या राजकीय जीवनाची मूर्तमेढ रोवली. सोबतच शेती हा व्यवसाय देखील सुरू होता. शेती आणि राजकारणाशी आसलेली नाळ अशा दोन्ही कलांच्या संगमातून स्वतःला सातत्याने सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आसे. आपल्या वाणीतून, राहणीमानातून व दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घटनांवर मात देत स्वतःला सावरत, सामाजिक कार्यामध्ये सक्रिय सहभागी असणारे. स्थानिक प्रश्नाबाबत जाण असणारे व्यक्तिमत्व म्हणून देखील ओळख निर्माण करणारे; सन्माननीय म्हणून आणि खेडो-पाड्यांमध्ये ओळख असणारे नेते. अनेक वेळा स्थानिक राजकारण अर्थात ग्रामपंचायत निवडणूक लढवली मात्र दोन्ही वेळी थोड्या मताने पराभूत झाले. मात्र गावाचा विकास आणि आपल्या शेतकरी मित्राचा विकास हाच संकल्प जणू उराशी बाळगून सातत्याने आपल्या कामाशी एकनिष्ठ राहिले. कधीही पराजयाचा खापर कोणावरही न फोडता स्वतःला सिद्ध करण्यासाठी पुन्हा-पुन्हा अग्नी परीक्षा देत राहायचे. ग्रामपंचायत निवडणूक मध्ये पराभूत झाले असले तरी; विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मध्ये मतदार राजांनी विश्वास दाखवून बिनविरोध सदस्य म्हणून निवड केली. सोसायटीमध्ये बिनविरोध निवड झाल्यापासून शेतकरी राजांसाठी केलेल्या कामाची पावती आजच्या निकालातून स्पष्ट दिसून येते.
कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक कार्यक्रम (२०२३) जाहीर झाला आणि त्यांना भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी देखील जाहीर झाली. ही उमेदवारी म्हणजे त्यांनी आजवर केलेल्या कार्याची पोच पावती म्हणावी लागेल. याचा परिणाम असा झाला की, आज कृषी उत्पन्न बाजार समिती धाराशिव (उस्मानाबाद) येथे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी हा गट. विमुक्त जाती, भटक्या-जमाती या प्रवर्गातील उमेदवार म्हणून ५९७ मते घेऊन सर्वाधिक मताधिक्याने विजयी देखील झाले. हा विजय धाराशिव तालुक्यातील सर्व मतदार राजांचा आहे. ज्यांनी विश्वास दाखवला आणि भरघोस मतांनी विजय केले. हा विजय नक्कीच शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती लढण्याकरिता झालेला आहे. शेतकरी राजांसाठी लढण्याची ताकद त्यांना मिळो ही निसर्ग चरणी प्रार्थना. शिवाय भविष्यात आपल्या हातून अनेक चांगले काम होवो. शेवटी माझे वडील या नात्यांने त्यांना भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. या विजयामध्ये ज्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या सहकार्य केले त्या सर्वांचे मनापासून आभार.
बळीराम शेषेराव चव्हाण, पीएच.डी (राज्यशास्त्र), धाराशिव (उस्मानाबाद), ९०२८४४६९४१/४२


छान च की
उत्तर द्याहटवा