HRA देण्यास टाळाटाळ व नोंदणी दिनांकापासून फेलोशिपचा अहवाल का गोपनीय ठेवला??
आज महाज्योती संशोधक विद्यार्थी कृती समिती महाराष्ट्र राज्य कडून महाज्योती संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालकांना नोव्हेंबर 2022 ते जानेवारी 2023 या तीन महिन्याचा HRA व विद्यापीठ नोंदणी दिनांकापासून अधिछात्रवृत्ति बाबत निवेदन देण्यात आले.
या निवेदनात असे सांगितले आहे की, महाज्योती ही संस्था ही बार्टी आणि सारथीच्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेली आहे. त्याच संस्थेच्या नियमावली वर आधारित महाज्योती संस्थेची नियमावली आहे. यूजीसी व बार्टी ही संस्था HRA देण्यासाठी कोणत्याच प्रकारचा बाॅन्ड विद्यार्थ्यांकडून घेत नाही. त्या संस्था नॉन हॉस्टेल या एकच प्रमाणपत्राच्या आधारे HRA देते. शिवाय सर्वोच्च न्यायालयाने देखील एका परिपत्रकानुसार सांगितले आहे की, शैक्षणिक कामासाठी कोणत्याही प्रकारचे बाॅन्ड विद्यार्थ्यांकडून घेण्यात येऊ नये. तरी देखील प्रत्येक संशोधक विद्यार्थ्यांकडून बाॅन्ड घेण्यात आले मात्र HRA दिला जात नाही. शिवाय या निवेदनात संचालकांना विद्यार्थ्यांनी आवाहन केले आहे की, जर संशोधक विद्यार्थ्यांचे बाॅन्ड चुकीचे असतील तर तसे लेखी परिपत्रक संस्थेने काढावे. सर्व संशोधकांना विद्यापीठाच्या नोंदणी दिनांकापासून अधिछात्रवृत्ति देण्यात यावी म्हणून 17 एप्रिल ते दोन 19 एप्रिल 2023 या कालावधीत आमरण उपोषण करण्यात आले होते. त्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने एक उच्चस्तरीय समिती नेमली होती. तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस व इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री मा. अतुलजी सावे यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचा मुंबई मंत्रालय येथे शब्द दिला होता. परंतु ते शब्द पाळला नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसुन येत आहे. महाज्योती संशोधक विद्यार्थी कृती समितीने महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या समितीचा अहवाल (सकारात्मक/नकारात्मक) जो काही असेल; त्या अहवालाची प्रत मागीतलेली आहे परंतु ही प्रत विद्यार्थीना देता येणार नाही असे स्पष्ट सांगुन शासनाच्या समितीचा अहवाल गुंडाळून ठेवण्याचा घाट संचालक करत आहे. या अहवालात नेमकं दडलंय काय? हा प्रश्न संशोधकांसमोर पडलेला दिसुन येतो.
महाज्योती संस्था ही संशोधक विद्यार्थ्यांची वेळोवेळी दिशाभूल करत आलेली आहे. महाराष्ट्र शासनाची कोणतीच संस्था विद्यार्थींकडुन HRA देण्यासाठी बाॅन्ड घेत नाही; नाॅन हाॅस्टेल या प्रमाणपत्राशिवाय. तसेच नोंदणी दिनांकापासून फेलोशिप देण्यात बाबतचा महाराष्ट्र शासनाचा अहवाल संस्थेस प्राप्त झालेला असुन ते प्रसिद्ध करण्यास संचालक महोदय अनुकूल नाही.
बळीराम शेषेराव चव्हाण, अध्यक्ष, महाज्योती संशोधक विद्यार्थी कृती समिती महाराष्ट्र राज्य.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा