मिशन-ए-हरपणी अर्थात पांढरे वादळ

मिशन-ए-हरपणी अर्थात पांढरे वादळ अपडेट.

15 सप्टेंबर 2023

उद्याच्या मिशन-ए-हरपणी औरंगाबाद आंदोलनाची तयारी पूर्ण!

आयोजक कार्यकर्त्यांची नुकतीच बैठक संपली!

आता हरपणींचा ऐतिहासिक विजय, अवघ्या काही तासाच्या अंतरावर!

पांढरे वादळ महामोर्चा, औरंगाबाद. 23 ऑगस्ट 2023
बोगस जात दाखला धारकाविरुद्ध SIT चौकशीची घोषणा करा, अन्यथा परिणामाला तयार रहा.

"मिशन-ए- हरपणी आंदोलन आयोजकांचा सरकारला निर्वाणीचा इशारा"!

राज्यभरातून शेकडो वाहनांचा ताफा, औरंगाबाद कडे आजच कूच करणार!

आपल्या पारंपरिक रंगबेरंगी बंजारा वेशभूषेतील हरपणी ब्रिगेड कडे मीडियाचे लक्ष!


 त्यांच्या शिस्तबद्ध हालचाली व आक्रमता टिपण्यास वृत्त वाहिन्या उत्सुक!

कायदा सुव्यवस्थेचे पालन होणार , आयोजकांनी दिला भरोसा!

तमाम समाज बांधवांनो,

आपल्या जातीय आरक्षण हक्कावर सरकारच्या चुकीने गदा आल्यामुळे आपल्याला आंदोलनाचे पाऊल उचलावे लागत आहे, त्या अर्थाने उद्याचे आंदोलन सरकारने आपल्यावर लादले आहे याची आपल्याला जाणीव असावी!

एकंदरीत कमजोर घटकांकडे बघण्याचा या सरकारचा हेतू शुद्ध नाही हे आम्ही आवर्जून सांगत आहोत!

कमजोर वर्गाचे सामाजिक आरक्षण डायरेक्ट रद्द न करता ज्यांना आरक्षण आहे त्या प्रवर्गात सशक्त समाज घुसवून जातीय सलोखा बिगडाऊन आपसात, माणसे झुंजवायचे व कमजोर वर्ग व आरक्षण दोघेही संपवायचे !

पांढरे वादळ, औरंगाबाद.
आरक्षण संपविण्याचा दुसरा मार्ग सरकारी क्षेत्रात 100 टक्के खाजगीकरण आणावयाचे! म्हणजे आरक्षण खतम ! हा या सरकारचा फंडा आहे!

म्हणून मित्रहो ही आपली लढाई एका आंदोलनापूर्ती नाही! आपल्याला खूप लढावयाचे आहे.

पहिला हल्लाबोल पांढऱ्या वादळ च्या नावाने आपणा सर्वांच्या ताकदी मुळे यश्यस्वी झाला.

उद्याची ही दुसरी चढाई आहे, ज्याचा भार व पुढाकार आपल्या बंजारा रणरागिण्यानी, आपल्या खांद्यावर घेतला आहे‌. त्यामुळेच या उद्याच्या मिशन ला, मिशन-ए-हरपणी नाव दिले आहे. मित्र हो ही लांब पल्याची लढाई आहे, येथे सय्यमी व तिखट माऱ्याची गरज आहे! सरकारची दुटप्पी भूमिका पहाता आपल्याला अजून खूप चढाया कराव्या लागतील ! त्या साठी सर्वांचे योगदान लागेल! म्हणून बघ्याच्या भूमिकेत न रहाता, आपण आंदोलनात जिद्दीने पेटलेल्या योध्याच्या भूमिकेत या !

समाज बांधवांनो आपला प्रत्येकाचा सहभाग अपेक्षित आहे, आपणही समाजाचे महत्वाचे घटक आहात. आपल्या हरपणिनी लढाईचे रणसिंग फुंकलेआहे, त्यांना व अयोजकांना राजपाल टिमला एकाकी पडू देऊ नका! उद्या रणभूमी आपली नक्कीच वाट पाहील, आम्हीही पाहू! मग चला तर भेटूया उद्याचे कुरुक्षेत्र क्रांती मैदान औरंगाबादला!

जय सेवालाल, जय लकीशा, बंजारा एकता झिंदाबाद.

राकेश जाधव, राष्ट्रीय अध्यक्ष, बंजारा क्रांती दल.

8308700581

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बंजारा समाजाला ST आरक्षण मिळावे

सावित्री ज्योती व आजच्या स्त्रिया

कृषी क्रांतीचे जनक वसंतराव नाईक