नोंदणी दिनांक, वाढीव रक्कम व सुधारित घरभाडे न दिल्यास आमरण उपोषणाचा इशारा..
आज महाज्योती संशोधक विद्यार्थी कृती समिती महाराष्ट्र राज्य. कडून समाज कल्याण येथील महाज्योतीच्या प्रादेशिक कार्यालयात विद्यापीठ नोंदणी दिनांकापासून फेलोशिप देण्यात यावी.
![]() |
| विद्यापीठ नोंदणी दिनांकापासून फेलोशिप संदर्भात. |
तसेच विद्यापीठ अनुदान आयोग यांचे पत्र १६ ऑक्टोबर २०२३ च्या सार्वजनिक सूचनेनुसार फेलोशिपच्या रकमेत जी वाढ केलेली आहे; ती रक्कम दिनांक १ जानेवारी २०२३ पासून अमंलबजावणी करावी. त्यानुसार फेलोशिप रक्कम वाढवून देण्यात यावी.
![]() |
| फेलोशिप वाढीव रक्कम संदर्भात.. |
शासनाच्या ५ फेब्रुवारी २०१९ च्या सुधारित नियमानुसार घर भाडे देण्यात यावे. याचे स्मरणपत्र व निवेदन महाज्योती या संस्थेस संशोधक विद्यार्थ्यांनी आज दिले. जर विद्यापीठ नोंदणी दिनांकापासून फेलोशिप, वाढीव रक्कम व सुधारित घरभाडे देण्याबाबत निर्णय न झाल्यास ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आमरण उपोषण करण्यात येईल. असा इशारा महाज्योती संशोधक विद्यार्थी कृती समिती महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष बळीराम चव्हाण यांनी दिला आहे. निवेदनावर बळीराम चव्हाण, रामेश्वर मुळे, वरुण जाधव, राठोड अंकुश, अनिल वीर, जयश्री भावसार, राधा घुगे, केदार अमृता, डोंगरे श्रीराम, वर्षा पवार, सरीता डोंगरजाळ, पवार ज्ञानेश्वर, पंडित चव्हाण इ. अनेक संशोधक विद्यार्थी उपस्थित होते...
![]() |
| वाढीव घरभाडे संदर्भात स्मरणपत्र.. |



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा